![]()
उद्धव ठाकरे, संजय राऊत हे कधी मनपाची सुद्धा निवडणूक लढले नाही त्यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या बोलताना मतदारसंघ असे फोडले जातील तसे फोडले जातील असे सांगू नये. राऊत यांना स्वत:चा मतदारसंघ नाही. त्यामुळे तुम्ही मतदारसंघाची चिंता करू नका, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उद्या विधेयक मंजूर झाल्यावर सांगा, ठाकरे, काँग्रेस देशाचे शत्रू आहेत का? हे सांगा असेही बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की,कुठल्याही खासदारांना संसदेत येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही ही माहिती संजय राऊत यांना नाही का? मनाला येईल ती वायफळ बडबड करण्याचा तुमचा धंदा गेली 4 ते 5 वर्षे सुरू आहे. उद्या तृणमृल काँग्रेस, काँग्रेस, उबाठाचे खासदार विधेयकाला पाठिंबा देणार आहेत आणि संजय राऊत तोंडावर पडणार आहेत. राऊतांच्या पक्षाकडून महिलांना शिवीगाळ नवनाथ बन म्हणाले की, नारी शक्ती विधेयक हे काही भाजप शक्ती विधेयक नाही.तर भारत शक्ती विधेयक आहे. महिलांना सन्मानाचे स्थान मिळण्यासाठी हे विधेयक आहे. महिलांची शक्ती वाढवणारे हे बिल आहे. लोकसभेत महिलांचे नेतृत्व पुढे यावे म्हणून हे विधेयक आहे. राऊतांकडून या विधेयकाला विरोध करण्यात येतोय कारण त्यांच्या पक्षाकडून महिलांना शिवीगाळ करण्यात येते, हे बिल आले तर आपल्या पक्षाचे काही खरे नाही हे राऊतांना समजले म्हणून ते विरोध करत आहे. या विधेयकाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान होऊ नये अशी राऊतांची इच्छा आहे. राऊतांना देशाचे तुकडे व्हावे असे वाटते नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत तुमच्या मनात कितीही इच्छा असेल की या देशात वनवा पेटावा तरी या देशात असे काही होणार नाही. कारण देश नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी उभा आहे. नारी शक्ती विधेयकाच्या माध्यमातून उत्तर VS दक्षिण असा सामना रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्हाला देशाचे तुकडे व्हावे असे वाटते आहे, पण असे काहीच होणार नाही. इतर देशात जेव्हा हिंसाचार झाला त्यावेळी तुम्ही स्वप्न पाहिले होते पण देश नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहे. आम्ही तुमच्यासारखे घरात बसत नाही नवनाथ बन म्हणाले की, 5 राज्यातील निवडणूक ही काय केवळ विरोधी पक्षातील खासदारांनाच आहे का? भाजपचे खासदार या निवडणुकीत मेहनत घेत आहेत. भाजपचे खासदार हे तुमच्यासारखे घरात बसून राहत नाही. ते लोकांमध्ये जातात, ते जर संसदेमध्ये येऊ शकतात तर बाकीच्या खासदारांना येण्यास काय समस्या आहे. विनाकारण पराभव होणार हे माहिती असल्याने ते पराभवाची कारणे शोधत असतात.
Source link
स्वत:चा मतदारसंघ नसलेल्यांनी मतदारसंघाच्या पुनर्रचनेवर बोलू नये:उत्तर विरुद्ध दक्षिण वाद निर्माण करून देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न थांबवा- नवनाथ बन