Headlines

Provide compensation for accidents caused by stray animals on roads: Supreme Court


  • Marathi News
  • National
  • Provide Compensation For Accidents Caused By Stray Animals On Roads: Supreme Court

नवी दिल्ली29 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘देशभरात जनावरांना महामार्ग व रस्त्यांवर असेच सोडून देता येणार नाही. ते नॅचरल स्पीड ब्रेकर नाहीत,’ अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. भटक्या जनावरांमुळे होणारे अपघात ही आता संपूर्ण देशाची समस्या बनली आहे. जनावरांच्या हल्ल्यात दरवर्षी १३०० हून अधिक मृत्यू होतात. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारांनी अशा अपघातांतील पीडितांना भरपाई देण्यासाठी वैधानिक यंत्रणा विकसित करावी व कायदा दुरुस्त करावा, असे निर्देश न्या. संजय करोल व न्या. एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने दिले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, पंजाबच्या संगरूरमध्ये २००७ मध्ये भटक्या वळूच्या हल्ल्यात विजय कुमार यांचा मृत्यू झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने विजय यांच्या पत्नीला चार आठवड्यांत १५ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.

सर्वोच्च न्यायालयाचे सल्ले

जनावरांशी संबंधित कायद्यांचे तात्काळ व कठोर पालन सुनिश्चित करावे. पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी यंत्रणा तयार करून कायद्यात सुधारणा करावी. सर्व जनावरांचे अनिवार्य टॅगिंग करून रेकॉर्डचे डिजिटल व्यवस्थापन करावे. जनावरे वाऱ्यावर सोडणाऱ्या मालकांची जबाबदारी निश्चित करावी. टॅगिंग व नोंदीच्या देखरेखीसाठी नोडल अधिकारी नेमा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *