Headlines

9 लाखांत पंच अन् चौधरींच्या साक्षीने होणार विवाह‎:सामुहिक विवाह लावण्याची समाजाची 14 वर्षांची परंपरा, शहरात 350 कुटुंबे वास्तव्यास‎




नंदवंशी अहीर गवळी समाजाच्या वतीने ८ आणि ९ मे २०२७‎रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.‎यासाठी संयोजन समितीची निवड झाली. अध्यक्षपदी‎धीरजलाल सिद्ध यांची सर्वानुमते निवड झाली. यंदा २५‎सामूहिक विवाह करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी ९ ते १०‎लाखांचा खर्च लोकवर्गणीतून उभा केला जाणार आहे, असे‎सिद्ध म्हणाले.‎ दोन वर्षांनी शहरात सामूहिक विवाह होतात. जालना आणि‎छत्रपती संभाजीनगर दोन्ही जिल्ह्यातील समाज मिळून हा ‎‎सोहळा करतो. गेल्या वर्षी जालन्यात १० सामूहिक विवाह‎झाले. यंदा छत्रपती संभाजीनगरात सोहळा होईल. समाजात ‎‎हुंडाबंदीची कडक परंपरा आहे. हुंडा देणे किंवा घेणे पूर्णपणे ‎‎निषिद्ध आहे. शहरात समाजाची एकूण ३५० कुटुंबे‎राहतात. माजी अध्यक्ष सुनील बागवाले यांचा विशेष सत्कार ‎‎झाला. संगीता पाहाडीये यांचाही विशेष सन्मान केला.‎ चौधरी आणि पंचांची ९० वर्षांची परंपरा‎ या समाजात आजही चौधरींची संमती अत्यंत महत्त्वाची असते. कोणत्याही‎शुभकार्यात चौधरींची पहिली उपस्थिती अनिवार्य मानली जाते. विवाह सोहळ्यात‎पंच स्वतः उपस्थित राहून आशीर्वाद देतात. यामुळे समाजबंध मजबूत राहतात‎आणि वाद कोर्टापर्यंत जात नाहीत.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *