Headlines

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी:यंदा ऑगस्ट महिन्यांत शाळांना 12 दिवस सुट्या




शाळेचे नवे शैक्षणिक सत्र सुरू होऊन आता २ महिने उलटले आहेत. लवकरच विद्यार्थ्यांच्या पहिल्या घटक चाचणीची लगबग सुरू होईल. मात्र, अभ्यासाच्या या धावपळीत विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात विद्यार्थ्यांना केवळ ९ सुट्या मिळाल्या होत्या; यंदा मात्र सण आणि उत्सवांमुळे यात वाढ झाली असून, ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांना एकाच महिन्यात तब्बल १२ सुट्या मिळणार आहेत. या महिन्यात रविवारी मिळणाऱ्या हक्काच्या सुट्यांसोबतच १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, नागपंचमी, रक्षाबंधन, ईद-ए-मिलाद यांसारख्या राष्ट्रीय आणि धार्मिक सणांची पर्वणी आहे. विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शनिवार आणि रविवारी जोडून सुटी असते; त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना १२ दिवसांच्या सुट्यांचा आनंद घेता येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *