Headlines

दिव्य मराठी मुलाखत:5 महिन्यांत वेरूळ कचरा अन् अतिक्रमणमुक्त करणार- जिल्हाधिकारी गौडा, कुंभमेळ्यापूर्वीच विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धाार




जिल्ह्याला कुंभमेळ्यानिमित्त मोठी संधी चालून आली आहे. आपल्याकडे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. यासोबतच वेरूळ लेणी, अजिंठा लेण्यांसारखी जागतिक वारसा स्थळे आहेत. दरम्यान नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्यां भाविकांपैकी ३० ते ४० टक्के नागरिक छत्रपती संभाजीनगरला येणार आहेत. यासाठी घृष्णेश्वर विकास आराखड्याचे काम वेगाने सुरू आहे. यासोबतच वेरूळ परिसर पुढील ५ महिन्यांत कचरामुक्त करणार असून, या वर्षअखेरीस परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात येईल. असा निर्धार जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान संवाद साधताना व्यक्त केला. ऐतिहासिक आणि औद्योगिक वारसा लाभलेल्या आपल्या जिल्ह्याला आता जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. १९८० च्या दशकात बजाजने जिल्ह्याला ओळख दिली. आता जिल्ह्यात टोयोटासारखा मोठा प्रकल्प येत आहे. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा वेग वाढवला जात आहे, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’च उलगडून दाखवला.
या संवादादरम्यान ते काही भावनिक आणि भविष्यातील मनोदयाविषयी ही भरभरून बोलले. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य, उद्योगांसाठी रेड कार्पेट: अखंड उड्डाणपूल, विमानतळ विस्तारीकरणाला गती उद्योग वेटिंगवर, एमआयडीसीसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू उद्योगांसाठी सटाणा, आरापूर आणि बिडकीन येथे नव्याने भूसंपादन केले जाणार आहे. यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमले आहेत. रिंग रोड, ग्रीनफील्ड आणि अखंड उड्डाणपुलाची कामे मार्गी लावली जात आहेत. विमानतळाचे विस्तारीकरण आणि विमानसेवा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे आपण जागा घेण्याआधीच बुकिंगसाठी उद्योग वेटिंगवर आहेत. एमआयडीसी आणखी जागा आपल्याकडून घेण्यासाठी उत्सुक आहे, असे जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले. जमिनीच्या फसवणुकीत अधिकारी, कर्मचारी आढळल्यास थेट बडतर्फीची कारवाई होणार जमिनीच्या फसवणुकीचे प्रकार मागील दिवसांत समोर आले. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. दोषींवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. यात महसूल किंवा अन्य विभागाचा अधिकारी, कर्मचारी आढळल्यास त्यांना नोकरीतून थेट बडतर्फ केले जाईल. तलाठ्यांनीदेखील नागरिकांची अडवणूक न करता नोटीस काढून ३० दिवसांत फेरफार निकाली काढणे आता बंधनकारक आहे. नागरिकांची अडवणूक होऊ नये म्हणून १०० टक्के कामकाज ई-ऑफिस केले. वाळू, मुरूम चोरी आणि अवैध डोंगर फोडणाऱ्यांवर कडक कारवाईसाठी विशेष जिल्हास्तरीय पथक स्थापन केले आहे. या नेमलेल्या पथकाच्या निदर्शनास कोणताही अनुचित प्रकाश आढळून आल्यास त्यांच्यावर थेट कारवाई केली जाणार आहे. आयएएस होण्याचे निश्चित नव्हते, गुगलमध्ये काम केले लहानपणी आयएएस, आयपीएस अधिकारी यायचे तेव्हा मला अप्रूप वाटायचे. मात्र, आपण स्वतः अधिकारी व्हावे, असे कधी वाटले नव्हते. संगणक शास्त्रात पदवी घेत असताना सिव्हिल सर्व्हिसमध्ये यावे असे वाटल्याने अभ्यास सुरू केला. पदवी पूर्ण झाल्यानंतर गुगलमध्ये ३ महिने इंटर्नशिप केली. त्यानंतर पूर्णवेळ अभ्यास सुरू केला. ३ वेळा मुलाखतीपर्यंत पोहोचलो आणि शेवटी निवड झाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी म्हणून नंदुरबार येथे काम केले. नंदुरबार आणि सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. चंद्रपूरचा जिल्हाधिकारी असताना बेस्ट कलेक्टर म्हणून सन्मानित करण्यात आले. ३ एप्रिल २०२६ पासून संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहे. जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी वाव आहे. असे जिल्हाधिकारी गौडा म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांचा मनोदय शाळांचा कायापालट: जि. प. शाळांचा चेहरा बदलण्यासाठी डीपीसी व सीएसआरमधून निधी उपलब्ध करणार. बिडकीनमध्ये १० कोटी खर्चून जिल्हा परिषदेची मॉडेल शाळा विकसित होत आहे. प्रत्येक तालुक्यात मॉडेल स्कूल: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक तालुक्यात अद्ययावत विज्ञान लॅब, कॉम्प्युटर लॅब, ऑडिटोरियम आणि अद्ययावत मैदान असलेली मॉडेल स्कूल उभारणार आहोत. गावोगावी जाणारा ध्यान रथ सुरू करण्याचा मानस आहे. सरकारी जमिनी सुरक्षित करणार: विशेष मोहिमेअंतर्गत सरकारी जमिनींची मोजणी करून त्यांना तार फेन्सिंग (कुंपण) केली जाईल. तसेच तेथे शासनाचा बोर्ड लावून जमिनीसंदर्भातील सर्व तपशील त्यावर प्रसिद्ध केला जाईल. (शब्दांकन : गणेश गाडेकर)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *