![]()
दर्यापूर शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात शुक्रवारी (दि. ३१) रात्री आठ वाजता थरारक दरोड्याने हादरला. भरवस्तीतील माहोरे ज्वेलर्समध्ये चार सशस्त्र लुटारुंनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत अवघ्या पाच मिनिटांत सुमारे अर्धा किलो सोने आणि तब्बल १३ किलो चांदी लंपास करुन पोबारा ठोकला. या दागिन्यांची किंमत सुमारे १ कोटी रुपयांच्या आसपास आहे. या सशस्त्र लुटीमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. शिक्षक कॉलनीतील गजानन माहोरे यांच्या घरासमोरील ज्वेलर्स दुकानात त्यांचा २३ वर्षीय मुलगा गोविंद माहोरे एकटाच होता. ही संधी साधून तोंडावर कापड बांधलेल्या चार लुटारुंनी दुकानात प्रवेश केला. गोविंदने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच एका दरोडेखोराने त्याच्यावर बंदूक रोखली, तर दुसऱ्याने चाकूचा धाक दाखवत त्याला पकडून ठेवले. त्याचवेळी उर्वरित तिघांनी दुकानातील सोन्या-चांदीचे सर्व दागिने अक्षरशः झडप घालून गोळा केले. जाताना त्यांनी गोविंद माहोरे यांचा मोबाईल फोनही हिसकावून नेला. दुकानासमोर रहिवासी वस्ती असल्याने काही महिलांनी दरोडेखोरांना पळून जाताना पाहिल्याचे सांगितले आहे. माहिती मिळताच एसडीपीओ सतीश कुलकर्णी, उर्वरित,पान.४
Source link
5 मिनिटांत अर्धा किलो सोने लंपास:बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्समध्ये लूट; व्यावसायिकांमध्ये दहशत