![]()
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात सारसबाग येथील स्मारकाला भेट देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले, आज महान देशभक्त लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाला स्मरण करतो. आज अण्णा भाऊ साठे यांची जयंती आहे. अण्णा भाऊ साठे यांना पाहून आपल्याला कळते की ते विद्यार्थी असताना फक्त दीड दिवस शाळेत गेले आणि तरी देखील ते लोकशाहीर झाले. अमित शहा म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी देशाला नवीन दिशा देण्यासाठी उद्घोषणा केली, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. जेव्हा त्यांनी हे वाक्य बोलले असेल तो क्षण कसा असेल याचा केवळ मी विचार करू शकतो. टिळक महाराजांनी जनतेला जोडण्याचे काम केले, त्यांनी आंदोलनात एका नवीन प्रकारच्या राष्ट्रवादाला जन्म दिला, सांस्कृतिक राष्ट्रवाद. त्यांनी गणेशोत्सव आणि शिवाजी जयंती सुरू केली. हा देश जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा, याच मार्गाने पुढे जाईल, हे त्यांनी तेव्हा ठरवले होते आणि आज तेच सुरू आहे. गीतारहस्य वाचण्याचा तरुणांना सल्ला मला लोकमान्य टिळकांचा गीतारहस्य हा ग्रंथ गुजरातीत मिळाला. माझे तरुणांना आवाहन आहे. तुम्ही टिळकांची गीता वाचा. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच चूक करणार नाही. मी गॅरंटी देतो. हा ग्रंथ भगवदगीतेचे व्यावहारिक स्वरूप आहे. सामान्य माणूस भगवतगीता कशी जगू शकतो. त्याचे व्यवहारीक स्वरुप त्यात आहे, असा सल्ला अमित शाह यांनी तरुणांना दिला आहे. इंग्रज फक्त केसरी आणि मराठा वृत्तपत्राला घाबरायचे अमित शहा म्हणाले, भगवद्गीतेला कसे जगू शकतो हे टिळकांनी दाखवून दिले आहे. त्यांनी शैक्षणिक व्यवस्था पुण्यात केली आणि त्यांनी बुद्धीला ज्ञान देणे हे शिक्षणाचे काम आहे, हा मंत्र दिला. इंग्रज जर कोणत्या वृत्तपत्राला घाबरत असतील तर ते केसरी आणि मराठाला घाबरत होते. टिळकांनी राष्ट्रच्या चेतनेला जागवूनच स्वतंत्रता मिळवली पाहिजे, असे म्हटले होते. पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, आत्मनिर्भरता देखील स्वराज्याचा भाग आहे हे टिळकांनी दाखवून दिले होते. त्यांचे जीवन हे आजच्या युवकांना प्रेरणास्त्रोत आहे. टिळकांची लेखनी कधी जुनी नाही होणार. अजित डोवाल यांना पुरस्कार देण्यासाठी मला बोलावले हे मी माझे भाग्य मानतो अमित शहा म्हणाले, आज हा पुरस्कार देण्यासाठी मी इथे आलो आहे. हा पुरस्कार अजित डोवाल यांना देण्यासाठी मला बोलावले हे मी माझे भाग्य मानतो. ज्यांनी आपले आयुष्य देशासाठी कामासाठी दिले त्यांना पुरस्कार देणे ही भाग्याची गोष्ट आहे. आज अजित डोवाल यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे आणि हे सगळ्यांनाच प्रेरणा देणारे ठरणार आहे. पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, मी गुजरातचा गृहमंत्री असताना पासून अजित डोवाल यांना ओळखतो. मोदीजी यांनी मला सांगितले होते की गुजरातमध्ये जो ब्लास्ट झाला त्याचा तपास करण्यासाठी अजित डोवाल यांची मदत घ्या. देशभरात झालेले ब्लास्टची चौकशी तेव्हा गुजरात पोलिसांनी केली होती आणि हे तेव्हा खूप मोठे यश होते. अमित शहा म्हणाले, जेव्हा सुरक्षेचा विषय येईल तेव्हा अजित डोवाल यांचे नाव घेतल्याशिवाय कोणी राहणार नाही. आज आपण देशात आपले स्थान मजबूत केले आहे आणि यात अजित डोवाल यांचे मोठे योगदान आहे. सिक्कीम, जम्मू काश्मीर, पंजाब, पाकिस्तानमध्ये राहून डोवाल यांनी अद्भुत योगदान देण्याचे काम केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालखंडाचा जेव्हाही इतिहास लिहिला जाईल आणि त्यात आंतरिक सुरक्षा आणि बाह्य सुरक्षेविषयी कोणी मीमांसा करेल तेव्हा स्पष्ट रूपाने अजित डोवाल यांच्यासाठी एक सुवर्ण पान राखीव ठेवावेच लागले. अजित डोवाल हे सर्वाधिक काळ राहिलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अमित शहा म्हणाले, 2005 साली अजित डोवाल यांनी निवृत्ती घेतली. मात्र, त्यानंतर देखील त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी काम करतच होते. विवेकानंद फाउंडेशनमध्ये त्यांनी काम सुरू केले. तिथे जे काही विषय उपस्थित झाले होते, ते सगळे पुस्तकांमध्ये बंद होते. पण नरेंद्र मोदी जेव्हा 2014 साली पंतप्रधान बनले आणि अजित डोवाल यांना एनएसए बनवले, त्यानंतर देशाची परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकली. पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, अजित डोवाल यांनी सैन्यात अनेक बदल केले, अनेक मोठे निर्णय घेतले गेले. नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाच्या मागे डोवाल यांचा मोठा अनुभव असायचा. मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की अजित डोवाल हे सर्वाधिक काळ राहिलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा गृहमंत्री अमित शहांचा पुणे दौरा:NSA अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; सुरक्षेच्या इतिहासात डोवाल यांच्या नावे ‘सुवर्ण पान’ राखीव- शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (शनिवार, 1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी सर्वप्रथम सारसबाग येथील स्मारकाला भेट देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला. वाचा सविस्तर
Source link
"तरुणांनो, 'गीतारहस्य' वाचा, आयुष्यात कधीच चूक करणार नाही":अमित शाहांचा युवकांना सल्ला; नेमके काय म्हणाले शहा?