Headlines

अभिजित दिपके यांची प्रकृती बिघडली:नागरिकांशी संवाद साधताना मळमळ आणि उलटीचा त्रास, भेट सोडून परतले




‘कॉकरोच जनता पार्टी’चे नेते अभिजीत दिपके यांच्या आरोग्याबाबत एक महत्त्वाची आणि काळजी वाढवणारी माहिती समोर आली आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान दिपके यांची प्रकृती अचानक खालावली. संवाद सुरू असतानाच त्यांना तीव्र मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याने, त्यांना हा कार्यक्रम अर्धवट सोडून घरी परतावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, जंतर-मंतर येथील तीव्र आंदोलनानंतर अभिजित दिपके यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. काही दिवसांत त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. मात्र, आज पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांना न भेटताच त्यांना माघारी फिरावे लागल्याने उपस्थितांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. घरीच उपचार आहेत सुरू सध्या डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या घरीच त्यांच्यावर उपचार करत असून, त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. वैद्यकीय तपासणीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. अभिजित दिपके यांनी नीट पेपरफुटीविरोधात पुकारलेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यामुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. आई-वडिलांसोबत वास्तव्य नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवरील आंदोलन संपताच अभिजित दिपके त्यांच्या स्वगृही छत्रपती संभाजीनगरमध्ये परतले आहेत. सध्या त्यांचा येथेच मुक्काम आहे. नागरिकांच्या भेटीगाठी आणि घरात आई-वडिलांना वेळ देण्यात ते सध्या व्यस्त आहेत. दिपके शिक्षणासाठी अमेरिकेत होते. मात्र, न्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर कॉकरोच पार्टीची अचानक केलेली स्थापना आणि नंतर नीट आंदोलनामुळे ते मायदेशी परतलेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *