Headlines

सफाई कामगारांचे थकीत वेतन वसुलीसाठी शिफारस करणार:चांदवडला आढावा बैठकीमध्ये मुकेश सारवान यांचे आश्वासन‎




नगरपरिषद हद्दीतील सफाई कामगारांचे थकीत वेतन व किमान वेतनातील फरक ठेकेदाराकडून वसूल करण्याची शिफारस संबंधित विभागांकडे करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मुंबईचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी दिले. सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत गुरुवारी तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत सफाई कामगारांनी ठेकेदारामार्फत आर्थिक व श्रमिक शोषण होत असल्याचे सांगत निवेदन सादर केले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाईची शिफारस सहायक कामगार आयुक्त, नाशिक, संचालक नगरपरिषद संचालनालय, मुंबई तसेच अप्पर मुख्य सचिव, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे करण्यात येईल, असे सारवान यांनी सांगितले. याबाबत ५ ऑगस्ट रोजी उपआयुक्त कार्यालय, नाशिक येथे होणाऱ्या बैठकीत पुढील कार्यवाही केली जाणार आहे. चांदवड ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर होण्यापूर्वी कार्यरत असलेल्या कायम सफाई कामगार व रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी ३० पदांचा प्रस्ताव मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी तयार केला आहे. शासन निर्णयानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात ही पदे मंजूर होऊ शकतात. ग्रामपंचायतीतील कायम सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतल्यानंतर उर्वरित पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचे आश्वासनही आयोगाच्या वतीने देण्यात आले.बैठकीस उपाध्यक्ष सारवान यांचे स्वीय सहाय्यक राजेश सोनवणे, नगराध्यक्ष वैभव बागूल, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, शिवसेना गटनेते तथा नगरसेवक संदिप उगले, नगरसेवक प्रदीप बनकरव उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *