![]()
जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार एसआयआर कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील दुबार, स्थलांतरित, मयत तसेच पत्त्यावर आढळून न आलेल्या मतदारांची पडताळणी करण्यासाठी शनिवारी (दि. १) मनमाड नगरपरिषदेची विशेष सभा झाली. या प्रक्रियेत संबंधित नगरसेवकांना मतदारांची यादी देऊन पडताळणी करून घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपनगराध्यक्ष मुकुंद एलिंजे, शिवसेना गटनेते महेंद्र शिरसाठ, नगरसेवक, मुख्याधिकारी शेषराव चौधरी, उपमुख्याधिकारी बागल तसेच मनमाड नगरपरिषद हद्दीतील ६३ बीएलओ व पर्यवेक्षक उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा मतदार नोंदणी अधिकारी सीमा अहिरे आणि मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. एसआयआर प्रक्रियेदरम्यान आढळून आलेले दुबार, पत्त्यावर न आढळलेले, कायमस्वरूपी स्थलांतरित व मयत मतदारांची यादी संबंधित नगरसेवकांना देण्यात येणार असून तिची प्रभागनिहाय पडताळणी केली जाणार आहे. नगरसेवकांनी एसआयआर प्रक्रियेबाबत विविध सूचना, अडचणी व शंका मांडल्या. त्यावर मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी मार्गदर्शन करून शंकांचे निरसन केले. मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रशासन, बीएलओ आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन करण्यात आले. नगरसेवकांनीही एसआयआर कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासनाला आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सभेस बीएलओ पर्यवेक्षक किरण आहेर, हरीश दाडगे, सुशांत राजगुरू, संजय गवळी, कैलास पाटील, दीपक पांडे आदी उपस्थित होते.
Source link
मतदार पडताळणीसाठी नगरसेवकांची घेणार मदत:मनमाड नगरपालिकेत एसआयआर कार्यक्रमांतर्गत विशेष सभा