- Marathi News
- National
- Heavy Rains For 5 Days In 20 States Including Maharashtra, Meteorological Department Warns, Army Rescues 27 Thousand People In Gujarat
नवी दिल्ली5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

देशातील मोठ्या भागात मान्सून सक्रिय आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व राजस्थानात हवामान प्रणाली तयार झाली आहे. यामुळे पुढील ५ दिवस महाराष्ट्रासह २० राज्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे.
यामध्ये हिमाचल, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, यूपी, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आदींचा समावेश आहे. दुसरीकडे, दक्षिण आणि मध्य गुजरातच्या अनेक भागांत परिस्थिती अत्यंत वाईट आहे. लष्कराच्या मदतीने सुमारे २७ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. केरळच्या इडुक्की आणि कोट्टायम जिल्ह्यांत भूस्खलनाचे ४ बळी गेले.
दरम्यान, देशात सर्वाधिक पाऊस मेघालयात पडतो, पण तिथेही जुलै महिना कोरडाच गेला. राज्यातील ११ पैकी १० जिल्ह्यांमध्ये खूप कमी पाऊस झाला. सोहरा (पूर्वीचे चेरापुंजी) आणि मावसिनराम या जगातील सर्वाधिक पावसाच्या भागांचा समावेश असलेल्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातही सुमारे ५०% पावसाची तूट राहिली.