Headlines

नागपूरमध्ये नाले-नदी सफाईवर 34 कोटींचा खर्च:तरीही पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी साचते पाणी, RTI मधून माहिती समोर




नागपूर महानगरपालिकेने गेल्या चार ते पाच वर्षांत नाले आणि नद्यांच्या सफाईवर तब्बल 34 कोटी 48 लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र, एवढा मोठा खर्च करूनही पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाणी साचणे आणि नाले तुंबण्याच्या घटनांमुळे मनपाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन व यांत्रिकी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाले सफाईसाठी 2022-23 मध्ये 99 लाख रुपये, 2023-24 मध्ये 1.93 कोटी रुपये, 2024-25 मध्ये 7 कोटी रुपये आणि 2025-26 मध्ये 8 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. चालू आर्थिक वर्षात (2026-27) नाले सफाईसाठी 9 कोटी रुपये आणि नद्यांच्या सफाईसाठी 4.95 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या पोकलेन मशिन्सवर 2024 मध्ये 2.89 कोटी रुपये आणि 2025 मध्ये 5.30 कोटी रुपये, असे एकूण 8.19 कोटी रुपये केवळ भाड्यापोटी मोजण्यात आले. याव्यतिरिक्त, 2022 ते 2026 या कालावधीत मशिन्सच्या डिझेल (इंधन) खर्चावर मनपाने 1.63 कोटी रुपये खर्च केले आहेत. एकीकडे 34 कोटींपेक्षा जास्त रक्कम कागदावर खर्च दाखवली जात असली, तरी प्रत्यक्षात झोन 1 ते 10 मध्ये नदी-नाले सफाईसाठी मनपाने केवळ 169 कर्मचारी तैनात केले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्ष जमिनीवर त्याचा काहीही फायदा दिसत नसल्याने मनपाच्या नियोजनशून्य कारभारावर नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *