Headlines

अण्णा भाऊंचे साहित्य शोषित घटकांना जगण्याची ताकद देणारे- प्राचार्य कोलते:सावळदबारा येथे अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन‎




तालुक्यातील सावळदबारा येथील जय कालिंका देवी शिक्षण संस्था संचलित शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि कै. लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशासकीय अधिकारी एन. आर. कोलते यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. संस्थाध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते आणि उपस्थित संचालक मंडळाच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून आपली मनोगते व्यक्त केली. मार्गदर्शन करताना शाळेचे प्राचार्य जीवन कोलते म्हणाले की, अण्णा भाऊंनी आपल्या शाहिरी आणि साहित्यातून केवळ मनोरंजन केले नाही, तर समाजातील शेवटच्या घटकाला जगण्याची ताकद दिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि गोवा मुक्ती संग्रामात त्यांच्या डफावर पडलेली थाप आजही प्रेरणादायी आहे. जग बदलू घालीन घाव, सांगून गेले मला भीमराव हा त्यांचा संदेश समाज परिवर्तनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही ऐतिहासिक घोषणा देऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली, असे प्रतिपादन त्यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *