Headlines

राजकारणातून नाही, भाजपमधून बाहेर पडा:आम्ही तुम्हाला राज्याची पहिली ओबीसी मुख्यमंत्री करू; विजय वडेट्टीवारांची पंकजा मुंडेंना ऑफर




भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतेच राजकारणातून निवृत्ती घेण्याबाबत काही संकेत दिले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आता यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत सूचक आणि मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याऐवजी भाजपमधून बाहेर पडावे, आम्ही त्यांना महाराष्ट्राची पहिली ओबीसी मुख्यमंत्री करण्यासाठी पूर्ण साथ देऊ, अशी थेट आणि खुली ऑफरच वडेट्टीवार यांनी दिली आहे. ‘पक्षात न्याय मिळत नसल्यानेच नैराश्य’ पंकजा मुंडे यांच्या निवृत्तीच्या संकेतांवर बोलताना वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, “पंकजा मुंडे यांना जर असे वाटत असेल की पक्षात त्यांना योग्य तो न्याय मिळत नाहीये, किंवा त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या त्यागाला पक्षात काहीच महत्त्व दिले जात नाहीये, तर त्या नैराश्यातूनच त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचे विधान केले असावे.” ‘राजकारणातून नव्हे, पक्षातून बाहेर पडा’ पंकजा मुंडे यांना जाहीर विनंती करताना वडेट्टीवार पुढे म्हणाले की, “पंकजाताईंना आमची एकच विनंती राहील की, तुम्ही एक मोठ्या आणि सक्षम ‘ओबीसी नेत्या’ आहात. त्यामुळे राजकारणातून निवृत्त होण्यासारखे टोकाचे पाऊल न उचलता, तुम्ही बिंधास्तपणे पक्षातून बाहेर पडा आणि राज्याच्या ओबीसी समाजाचे खंबीर नेतृत्व करा.” ‘पहिली ओबीसी मुख्यमंत्री करण्यासाठी साथ देऊ’ यावेळी वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना मोठी राजकीय ऑफर दिली. “तुम्ही भाजपमधून बाहेर पडून ओबीसींचे नेतृत्व करा आणि महाराष्ट्राच्या पहिल्या ‘ओबीसी मुख्यमंत्री’ व्हा, यासाठी आम्ही आणि आमचा पक्ष तुम्हाला पूर्ण साथ देऊ,” असा शब्द वडेट्टीवार यांनी दिला आहे. ‘१०० टक्के काँग्रेसमध्ये घेऊ’ जर पंकजा मुंडे यांनी खरोखरच भाजपला रामराम ठोकला, तर काँग्रेस त्यांना पक्षात घेणार का? असा सवाल पत्रकारांनी विचारला. यावर उत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “जर पंकजा मुंडे भाजपमधून बाहेर पडल्या, तर आम्ही त्यांना १०० टक्के काँग्रेस पक्षात प्रवेश देऊ.” हेही वाचा.. पंतप्रधान अन् गृहमंत्री हरवले: मोदी-शहांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, ते संसदेत यायला घाबरतात का?, संजय राऊतांचा सवाल आम्ही सर्वांनी ठरवले आहे की देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवले आहेत अशी जाहिरात द्यायची.संसदेचे अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सभागृहात उपस्थित राहिले नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री सभागृहात येण्यास घाबरत आहेत का? जर संसद चालवायचीच नव्हती, तर संसदेची नवीन इमारत कशासाठी उभारली? त्यांनी सोशल मीडियावरच संसद चालवावी, असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *