Headlines

भारत-अमेरिकेच्या कृषी कराराला‎ किसान युनियनकडून तीव्र विरोध:केंद्राने शेतकरी संघटनांशी चर्चा करावी, जालन्यात राकेश टिकैत यांची मागणी‎



भारत-अमेरिका प्रस्तावित कृषी‎‎ आणि व्यापार ‎‎‎करारावरून ‎‎शेतकरी संघटनांनी ‎‎‎पुन्हा संघर्षाची ‎‎‎भूमिका घेतली‎‎ आहे.‎‎शेतकऱ्यांच्या ‎‎‎हिताशी ‎कोणतीही तडजोड मान्य नसल्याची ‎‎भूमिका भारतीय किसान युनियनचे ‎‎राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकैत यांनी ‎मांडली.

.

कृषी क्षेत्राशी संबंधित कोणताही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आंतरराष्ट्रीय करार करताना‎ सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या हिताचे‎ संरक्षण झाले पाहिजे. अन्यथा त्याचे‎ परिणाम थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर‎ होतील, असे टिकैत म्हणाले.‎

महाराष्ट्रात संघटनात्मक ‎बांधणीला सर्वोच्च प्राधान्य‎

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आर्थिक‎स्थिती चिंताजनक असल्याचे नमूद‎ करताना त्यांनी शेतकरी‎ आत्महत्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर‎असल्याचे सांगितले. शेतीविषयक ‎प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि‎ शेतकऱ्यांचा आवाज सक्षम ‎करण्यासाठी राज्यात संघटनात्मक‎ बांधणीला प्राधान्य दिले जात आहे.‎

शेतकरी हिताला बाधा‎ होणार नाही याची खात्री द्या‎

कृषी व व्यापार करार अंतिम‎ करण्यापूर्वी केंद्र सरकारने शेतकरी ‎संघटनांशी व्यापक चर्चा करावी.‎करारातील कृषी विषयक अटी स्पष्ट‎ कराव्यात. भारतीय शेतकरी तसेच ‎दुग्ध उत्पादकांच्या हिताला बाधा‎ पोहोचणार नाही, याची हमी द्यावी.‎अन्यथा देशव्यापी आंदोलनाचा‎ इशारा दिला.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *