![]()
सहा वर्षांपूर्वी आत्महत्या केलेला प्रख्यात अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासातील गंभीर त्रुटींवर मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत. “दिशाच्या वडिलांनी तिच्या मृत्यूच्या परिस्थितीबद्दल स्पष्ट संशय व्यक्त केला असताना पोलिसांनी एफआयआर नोंदवून रीतसर तपास का केला नाही?’ असा थेट सवाल न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने उपस्थित केला. सोमवारी या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांच्या दाव्यांमधील विसंगतींवर बोट ठेवले. “एखादी व्यक्ती १४ व्या मजल्यावरून खाली पडल्यास तिच्या शरीरावर एकही जखम कशी नाही?’ असा सवाल न्यायमूर्ती डांगरे यांनी विचारला. एफआयआर नोंदवलेला नाही आणि केवळ अपघाती मृत्यूची चौकशी सुरू आहे. मग याचिकाकर्त्याला यासंबंधीची कागदपत्रे देण्यात पोलिसांना काय अडचण आहे, अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांना फटकारले. त्यावर सरकारी वकील शिशिर हिरे यांनी छायाचित्रांनुसार डोक्याला जखमा असल्याचे स्पष्ट केले. मात्र, याचिकाकर्त्याचे वकील नीलेश ओझा यांनी सुरुवातीच्या छायाचित्रांमध्ये अशा जखमा नव्हत्या. पोलिसांनी नंतर ही छायाचित्रे बनावट तयार केल्याचा आरोप केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ ऑगस्ट रोजी होणार आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे यांचा दावा आहे की, दिशाचा मृत्यू ज्या पार्टीत झाला तेथे तत्कालीन कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. राजकीय वजन वापरून पुरावे नष्ट करण्यात आले. घटनेला अपघाती मृत्यू किंवा आत्महत्येचे रूप देण्याचा प्रयत्न झाला. आदित्य यांची नार्को टेस्ट करून त्यांना अटक करावी, अशीही राणेंची मागणी आहे. या ४ कारणांमुळे ५ वर्षांपूर्वीचा अहवाल उघड करण्यासाठी दिशा सालियनचे वडील आग्रही सतीश सलियान यांचे वकील नीलेश ओझा यांनी सांगितले- १. उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांमुळे पोलिसांना एफआयआर नोंदवून सर्व संबंधित पुरावे व कागदपत्रे तातडीने न्यायालयात सादर करावी लागतील. २. पोलिसांनी कोणालाही न बोलावता घटनेचे रिक्रिएशन केले. मृतदेहाची खरी स्थिती दर्शवणारा अहवाल तसेच मोबाइल टॉवर लोकेशन डेटा रेकॉर्डवरून गायब केला हेही स्पष्ट होईल. ३. फोटोंमध्ये चेहऱ्यावर कोणतीही जखम दिसत नसताना शवविच्छेदन अहवालात सर्व दात व जबडा तुटल्याचे
दाखवले गेले ही बाब उघड होईल. ४. सीबीआय चौकशीची मागणी मान्य झाल्यास आदित्य ठाकरे अडचणीत येतील. दिशा सालियन मृत्युप्रकरणी मुंबई पोलिसांना सवाल नीलेश ओझा यांनी सुरुवातीच्या छायाचित्रांमध्ये अशा जखमा नव्हत्या. पोलिसांनी नंतर ही छायाचित्रे बनावट तयार केल्याचा आरोप केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ ऑगस्ट रोजी होणार आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे यांचा दावा आहे की, दिशाचा मृत्यू ज्या पार्टीत झाला तेथे तत्कालीन कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. राजकीय वजन वापरून पुरावे नष्ट करण्यात आले. घटनेला अपघाती मृत्यू किंवा आत्महत्येचे रूप देण्याचा प्रयत्न झाला. आदित्य यांची नार्को टेस्ट करून त्यांना अटक करावी, अशीही राणेंची मागणी आहे. काय आहे दिशा सालियन मृत्यू प्रकरण केव्हा घडली घटना? : ८ जून २०२०च्या रात्री. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या ६ दिवस आधी.
कुठे घडली? : मुंबईतील मालाड परिसरातील एका बहुमजली निवासी इमारतीत.
पोलिसांनी काय केले : अपघाती मृत्यूची नोंद करत आत्महत्येचा निष्कर्ष काढला.
आता चर्चेत का? : दिशाचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ही आत्महत्या नसून सामूहिक बलात्कार व हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात एफआयआर नोंदवून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
Source link
14व्या मजल्यावरून पडूनही दिशाच्या शरीरावर जखमा कशा नाहीत?- कोर्ट:24 ऑगस्टला सुनावणी; आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ