![]()
शहरातील इंदिरानगर परिसरात सोमवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य, जीवनावश्यक वस्तू व अन्य सामग्री जळून खाक झाली. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शहरातील कडुबाई भगवान घुंगासे व आशाताई घुंगासे यांच्या राहत्या घरात अचानक विद्युत शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. काही क्षणांतच आगीने घराचा मोठा भाग व्यापल्याने घरातील साहित्य आगीत भस्मसात झाले. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा विद्या कावसानकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी घुंगासे कुटुंबीयांना शक्य ती सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. प्रतिनिधी | गंगापूर आमदार प्रशांत बंब यांच्या पुढाकारातून जप्त करण्यात आलेल्या अवैध वाळूचा लोकहितासाठी वापर करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आज वडगाव टोकी परिसरातून सुरू करण्यात आला. नदीकाठ परिसरात महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्यातील वाळू आता शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी तालुक्यात तब्बल ५० हायवा आणि १० ते १५ जेसीबी यंत्रसामग्री कार्यरत करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात वाळूचे नियोजनबद्ध वितरण सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी सुमारे ५० घरकुल लाभार्थ्यांना वाळूचे वाटप करण्यात आले. यावेळी गंगापूरचे तहसीलदार नवनाथ वाघवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जाराड, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच आमदार प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले की, तालुक्यात आणखी चार ते पाच ठिकाणी अवैध वाळूचे साठे जप्त करण्यात आले आहेत. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवड्यापासून त्या साठ्यातील वाळूदेखील याच पद्धतीने घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरित करण्यात येणार आहे.
Source link
शॉर्टसर्किटमुळे घराला आग; संसारोपयोगी साहित्य खाक:पैठणची घटना; कावसानकर यांचे मदतीचे आश्वासन