देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे नेते सातत्याने जनतेमध्ये असतात त्यांचे प्रश्न सोडवतात त्यामुळे घरामध्ये कोण बसते आणि जनतेचे प्रश्न कोण सोडवते हे जनतेला माहिती आहे. ज्यांचे मालक आणि ते 24 तास घरात बसलेले असतात त्यांनी लोकांच्या प्रश्
.
नवनाथ बन म्हणाले की, निखील वागळे यांनी तुमच्यावर टीका केली तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करायला हवी होती पण तुमच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी त्यांच्या कार्यालयावर जात हल्ला केला होता. तुम्ही दुतोंडी गाडूळासारखे वागू नका. प्रत्येक वेळी वेगळी भूमिका घेण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात खंडणीखोर, टपोरी, आणि सुपारी घेणारे कोण आहे हे जनतेला माहिती आहे. भाजपने हिंदुत्वासाठी तुमच्यासोबत युती केली होती पण तुम्ही हिंदुत्ववाद सोडून काँग्रेसची घरोबा केला आता तुम्ही भाजपसोबत युती करू शकत नाही. तुमची कितीही इच्छा असली तरी ते आता शक्य नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपर्यंततुम्ही जवळ करत नाही तो पर्यंत युतीचा विषयच नाही.
उद्धव ठाकरे ढोंगी गुड्डा
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या टीकेचे समर्थन केले आहे, त्यांना त्यामध्ये काहीही चुकीचे वाटत नाही. राऊतांना काँग्रेसचे समर्थन करताना लाज वाटली पाहिजे. तुम्हाला ढोंगी गुड्डा म्हटले पाहिजे. तुम्ही आणि उद्धव ठाकरे जो ढोंगीपणा करत असतात. ढोंगाचे राजकारण करणे हे उबाठाकडून सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना जर गुंगा गुड्डा म्हणणार असतील तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ढोंगी गुड्डा आहेत ते ढोंगीपणाचे राजकारण करत असतात.
तेव्हा राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती
नवनाथ बन म्हणाले की, नारायण राणे यांनी मविआचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांच्यावर व्यक्ती म्हणून नाही तर मुख्यमंत्री म्हणून टीका केली होती. त्यानंतर तुमच्या सरकारने नारायण राणे यांना अटक केली, कोर्टाने तुम्हाला चपराक दिली. राणे यांनी महाराष्ट्राचे नाकर्ते मुख्यमंत्री असे म्हटले होते. कंगणा रणौत यांचे घर तोडले, कंबोज यांना नोटीस पाठवली त्यावेळी दोघांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती व्यक्ती म्हणून उद्धव ठाकरेंवर नाही. राऊतांनी काही बोलण्यापूर्वी आत्मपरीक्षण केले पाहिजे.
राऊतांनी महिलेला काय शिवीगाळ केली जनतेला माहिती
नवनाथ बन म्हणाले की, महिलांविषयी चांगली भाषा वापरली पाहिजे हे संजय राऊत सांगत आहे, त्यांनी स्वप्नाताई यांच्याविषयी काय काय भाषा वापरली. काय काय शिव्या दिल्या हे महाराष्ट्राने ऐकल्या आहेत. राऊतांची भाषा काय आहे? ते रोज सकाळी माध्यमांसमोर येत शिवीगाळ करत आहे ही भाषा योग्य आहे का? तुम्ही भाषेचे ज्ञान जगाला शिकवू नका. तुमच्या भाषेला महाराष्ट्र वैतागला आहे.
हे ही वृत्त वाचा
सुनेत्रा पवारांवरील टीका ही महिला म्हणून नाही, तर उपमुख्यमंत्र्यांच्या मौनावर:प्रश्नांवर लपून बसणारे मोदी-शहा ‘गुंगे-गुड्डे’ उपमुख्यमंत्र्यांनी तीच भूमिका स्वीकारली का?- राऊत

सुनेत्रा पवार यांचा जो पक्ष आहे तो अमित शहा यांचा पक्ष आहे. ते जसे लपून बसले आहेत ती भूमिका यांनी स्वीकारली आहे का? अमित शहांना आम्ही प्रश्न विचारतो आहे की जंतरमंतरवर लाठीचार्ज आणि कारवाईचे आदेश कोणी दिले पण त्यांनी मौन बाळगले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे दोघेही गुंगा गुड्डे आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर