![]()
जिल्हाभरात वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी सुरू असल्याने नागरिक घाईघाईत रस्त्यावरील विक्रेत्यांकडून हेल्मेट खरेदी करत आहेत. मात्र, या संधीचा फायदा घेत निकृष्ट दर्जाची हेल्मेट विक्रीसाठी आली आहेत. अनेक बनावट हेल्मेटवर ‘आयएसआय’ चिन्हासारखे दिसणारे स्टिकर लावून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे.केवळ ‘आयएसआय’ मार्क दिसल्याने हेल्मेट दर्जेदार ठरत नाही. अपघाताच्या वेळी अशी निकृष्ट हेल्मेट्स दुचाकीचालकाच्या डोक्याचे रक्षण करू शकत नाहीत, ज्यामुळे अपघातात गंभीर दुखापत होण्याचा किंवा जिवाला धोका निर्माण होण्याचा मोठा संभव असतो. हेल्मेट हे केवळ पोलिसांचा दंड किंवा चालान वाचवण्यासाठी नसून, स्वतःचा अमूल्य जीव वाचवण्यासाठी आहे. त्यामुळे खरेदी करताना विक्रेत्याकडून अधिकृत बिल घ्यावे आणि ‘बीआयएस केअर’ ॲपद्वारे परवाना क्रमांकाची खात्री करून घ्यावी. हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्यास अपघातावेळी डोक्याला गंभीर इजा होऊन मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे हेल्मेट घालूनच दुचाकी चालवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. असे ओळखा ओरिजनल हेल्मेट या हेल्मेटवर ‘बीआयएस”प्रमाणपत्रा सह ‘सीएम/ एल’ परवाना क्रमांक आहे का, हे तपासा. ‘बीआयएस केअर’ ॲपमध्ये हा क्रमांक टाकून त्याची पडताळणी करा. हेल्मेटचे वजन, आतील ‘ईपीएस’ फोम, स्ट्रॅप व लॉकची गुणवत्ता तपासा. अधिकृत विक्रेत्याकडूनच पक्क्या बिलासह खरेदी करा. दर्जाची खात्री करा ^हेल्मेट खरेदीवेळी दर्जाची खात्री करा. ‘बीआयएस केअर’ॲपमध्ये आयएसआय मार्क तपासा. हेल्मेटचे परवाना क्रमांकाची पडताळणी करा. – मनोज बहुरे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा.
Source link
हेल्मेटवर बनावट ‘आयएसआय' मार्क लावून होतेय फसवणूक