Headlines

महिला संघटनेच्या बळकटी करणासाठी शिवसेनेचे नियोजन:नांदगावी शिवदुर्गा-शिवसंवाद दौऱ्यानिमित्त बैठक‎




शिवसेनेच्या राज्यव्यापी ‘शिवदुर्गा-शिवसंवाद’ दौऱ्यानिमित्त नांदगाव येथे महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. महिला संघटना अधिक बळकट करणे, पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक नियोजनावर बैठकीत भर देण्यात आला. शिवसेना नेत्या मीना कांबळी यांच्या समन्वयातून झालेल्या बैठकीत महिला आघाडीची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अंजुम कांदे यांनी मतदारसंघातील महिला सक्षमीकरण, महिला संघटन आणि सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा मांडला. आमदार सुहास कांदे यांनी लोकहितवादी योजना, विकासकामे आणि महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. बैठकीत प्रत्येक प्रभाग, गाव आणि शाखास्तरावर महिला पदाधिकाऱ्यांचे जाळे मजबूत करणे, नवीन शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या, मतदारयादी पुनरीक्षण, बूथनिहाय संघटन बळकट करणे, जनसंपर्क वाढविणे आणि आगामी निवडणुकांसाठी प्रभावी रणनीती आखण्यावर भर देण्यात आला. यावेळी उपनेत्या शीतल म्हात्रे, तृष्णा विश्वासराव, संजना घाडी, माजी आमदार निर्मला गावित, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्कप्रमुख संगीता खोडाना यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *