Headlines

जामनेर बस स्थानकात एकाच दिवशी महिलेची पर्स, सोन्याची पोत लंपास:चोरीच्या घटना वाढल्या; सावधगिरी बाळगण्याची व्यक्त होतेय गरज‎




येथील बस स्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट वाढला असून, एकाच दिवशी दोन महिलांना चोरांनी लक्ष्य केले. यात एका महिलेची पर्स लांबवण्यात आली, तर दुसऱ्या ज्येष्ठ महिलेची सोन्याची मंगलपोत चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बस स्थानकात बसमध्ये चढताना एका महिला प्रवाशाची पर्स चोरट्या महिलेने लांबवली. हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट कैद झाला. स्थानिक महिला प्रवाशांनी तत्परता दाखवत संशयित चोरट्या महिलेला जागीच पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या महिलेला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. पोलीस पर्स चोरी प्रकरणाची चौकशी करत असतानाच, दुसऱ्या बसमध्ये चढताना मायखेडा दिगर येथील एका वृद्ध महिलेची तब्बल अडीच लाख रुपये किमतीची ३ तोळ्याची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली. दागिना चोरीला गेल्याचे लक्षात येताच वृद्ध महिलेने आरडाओरड केली. त्यानंतर ती बस थेट पोलीस ठाण्यात नेऊन सर्व प्रवाशांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ संशयितांची चौकशी केली, मात्र चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. ^प्रवास करताना महिलांनी सोनसाखळी किंवा मंगल पोत अशा किमती वस्तू वापरणे टाळावे. रोख रक्कम सुरक्षित राहील अशा पद्धतीने ठेवावी. काही विशिष्ट वेळी गर्दी होत असल्याने चोरटे संधी साधतात. अशावेळी सावध राहणे गरजेचे आहे. – मुरलीधर कासार, पोलीस निरीक्षक, जामनेर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *