![]()
सुनेत्रा पवार यांचा जो पक्ष आहे तो अमित शहा यांचा पक्ष आहे. ते जसे लपून बसले आहेत ती भूमिका यांनी स्वीकारली आहे का? अमित शहांना आम्ही प्रश्न विचारतो आहे की जंतरमंतरवर लाठीचार्ज आणि कारवाईचे आदेश कोणी दिले पण त्यांनी मौन बाळगले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे दोघेही गुंगा गुड्डे आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसच्या गुंगी गुडिया या वक्तव्याचा खुलासा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काल केला आहे. सुनेत्रा पवार या राजकारणात जरी नवीन असल्या तरी त्यांच्या दोन्ही कुटुंबामध्ये राजकारण आहे. पण बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला गेला आणि त्यावर त्यांनी मौन बाळगले त्यावर काँग्रेसने टीका केली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे राज्यात होणाऱ्या घटनांकडे आहे. पत्रकारांनी जर धनंजय मुंडे संदर्भात प्रश्न विचारला हे आपण जर स्वीकारले तर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी भाष्य केले असते तर ते योग्य झाले असते. सरकारमध्ये अनेक गुंगे गुड्डे संजय राऊत म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या जागी जर कोणी पुरुष मंत्री असता किंवा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस असते तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटले असते. राजकारणात टीका सहन केल्या पाहिजे आणि यापुढे तशा चुका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया म्हटले जात होते पण त्यांनी सिद्ध केले की मी स्वतंत्र बाण्याची व्यक्ती आहे. सरकारमध्ये असे अनेक गुंगे गुड्डे आहेत जे अडचणीच्या प्रश्नावर बोलणं टाळतात. यामध्ये स्त्री-पुरुष भेद करणे टाळतात. हा काही स्त्रीचा अपमान आहे असे मला वाटत नाही कारण त्या घटनात्मक पदावर बसले आहात. गुंगी गुडिया काही असंवैधानिक शब्द नाही. काँग्रेस कार्यालयात केलेले आंदोलन चुकीचे संजय राऊत म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्यावर कोणी टीका केलेली नाही. ती टीका उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री म्हणून केली आहे. शब्द जपून वापरायला पाहिजे हे जरी खरे असले तरी हा काही त्यांचा अपमान नाही. सुरज चव्हाण यांनी केलेले आंदोलन चुकीचे आहे. इंदिरा गांधी यांच्यावर सुद्धा टीका करण्यात आलर होती पण त्यांनी मी गुंगी गुडिया नाही हे सिद्ध केलं. हे ही वृत्त वाचा धनुष्यबाणावर कोणाचा हक्क?:अडीच वर्षांपासूनच्या शिवसेना वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
शिवसेनेतील फुटीनंतर सुरू झालेल्या पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गेली अडीच ते तीन वर्षे सुरू असलेल्या या प्रकरणाकडे आज संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. वाचा सविस्तर
Source link