Headlines

'हैदराबाद गॅझेटिअरने आरक्षण मिळत नाही:सरकारने समाजाला फसवले हे मनोज जरांगेंना आधीच सांगितले होते- शिवानंद भानुसे




देवेंद्र फडणवीस, विखे पाटील अन् सर्वांत मोठे एकनाथ शिंदेंनी समाजाला फसवले हे सत्य आहे, जरांगे पाटील का फसत आहेत? त्यांनी फसू नये समजून घ्यावे, असे मराठा सेवा संघाचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे. हैदराबाद गॅझेटिअर लागू करून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसते, हे 2 सप्टेंबरचा शासन निर्णय निघण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना सांगितले होते असे त्यांनी बुलढाणा येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. शिवानंद भानुसे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मी साक्षीदार राहिलो आहे. मी त्यांच्या शिष्ट मंडळातही काम केले आहे. मुख्यमंत्र्यी आणि मंत्रिमंडळाशी देखील चर्चा केली आहे. मराठा सेवा संघाने 1990 पासून लढा सुरू केला होता मराठ्याचे ओबीसीकरण त्याच पद्धतीने हे आंदोलन पुढे सुरू होते. परंतु वाशीमध्ये सगेसोयरे हा मुद्दा ज्यावेळी आला त्यावेळी आम्ही त्याला विरोध केला होता. या मुद्द्यामुळे आरक्षण मिळू शकत नाही. मनोज जरांगेंनी सांगितले की वकील सांगत आहे का ते खोटे आहे का? 2 सप्टेंबरचा शासन निर्णय निघण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांना सांगितले होते की हैदराबाद गॅझेटिअर लागू करून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसते. भाजपचे सरकार आहे तोवरच SEBC आरक्षण शिवानंद भानुसे म्हणाले की, आज मराठा समाजाला SEBC अंतर्गत 10 टक्के आरक्षण आणि सवलती मिळाल्याने त्यांच्यासाठी इतर काही मार्ग बंद झाले आहेत. हे SEBC आरक्षण राज्यातील भाजपचे सरकार आहे तोपर्यंतच टिकणार आहे. हे आरक्षण जर दीर्घकाळ टिकवायचे असेल आणि त्याचा मराठा समाजाला खरोखर फायदा करून द्यायचा असेल, तर या आरक्षणाचे स्वरूप राजकीय फायद्यापुरते मर्यादित न ठेवता ते पूर्णपणे ‘ओबीसी’ प्रवर्गाप्रमाणे लागू केले पाहिजे. ’58 लाख नोंदींचा काय फायदा? शिवानंद भानुसे म्हणाले की, 11 महिन्यानंतर आज जरांगे पाटील म्हणत आहे की सरकारने आम्हाला फसवले. आम्ही गोलमेज परिषद घेत सांगितले होते की विखे पाटील आणि देवेंद्र फडणवीस आपल्याला फसवत आहेत. हे कळण्यासाठी समाजाला इतका वेळ लागत असेल तर आपण काय करायचे. जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करणार आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत तर 58 लाख नोंदी आणि तत्सम मागण्या आहेत. 58 लाख नोंदी या 1967 पासूनच्या आहेत. जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू झाल्यापासून 51 हजार नोंदी 3 लाख 11 हजार प्रमाणपत्र आणि साडे तेरा हजार व्हॅलिडीटी झालेल्या आहेत हे यश आहे, पण केवळ 2 ते 3 टक्के. जरांगेंनी तज्ञ मंडळी सोबत ठेवली पाहिजे शिवानंद भानुसे म्हणाले की, आता जर सरकारकडे मागण्या करायच्या असतील तर त्या अभ्यासपूर्ण केल्या पाहिजेत. तज्ञ मंडळी सोबत ठेवली पाहिजे.पुरुषोत्तम खेडेकर, बी. जी.कोळसे पाटील यांच्यासारख्या लोकांना सोबत घेतले पाहिजे. 58 लाख नोंदी मिळालेल्याच आहेत आपण त्या मागतो कशासाठी हा प्रश्न आहे. समाजाला लगेच काय मिळेल याचा विचार केला पाहिजे. गेल्या 40 वर्षांप्रमाणे आताची 3 वर्षेही वाया गेली आहेत; त्यामुळे यापुढे समाजाच्या पदरात ठोस काहीतरी पडेल अशाच मागण्या लावून धरल्या पाहिजेत. हे ही वृत्त वाचा

सुनेत्रा पवारांवरील टीका ही महिला म्हणून नाही, तर उपमुख्यमंत्र्यांच्या मौनावर:प्रश्नांवर लपून बसणारे मोदी-शहा ‘गुंगे-गुड्डे’ उपमुख्यमंत्र्यांनी तीच भूमिका स्वीकारली का?- राऊत

सुनेत्रा पवार यांचा जो पक्ष आहे तो अमित शहा यांचा पक्ष आहे. ते जसे लपून बसले आहेत ती भूमिका यांनी स्वीकारली आहे का? अमित शहांना आम्ही प्रश्न विचारतो आहे की जंतरमंतरवर लाठीचार्ज आणि कारवाईचे आदेश कोणी दिले पण त्यांनी मौन बाळगले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे दोघेही गुंगा गुड्डे आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *