![]()
पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात एका अनोळखी व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना 3 ऑगस्ट रोजी रात्री घडली. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. बंडगार्डन पोलिसांना रात्री पावणेबाराच्या सुमारास माहिती मिळाली की, रेल्वे स्थानकाच्या आवारातील पार्किंगमध्ये लावलेल्या रिक्षात एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत पडली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी व्यक्तीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी घोषित केले. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस रेल्वे स्थानकाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. खून झालेली व्यक्ती फिरस्ती असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश वानखेडे करत आहेत. मद्यपींकडून एकाला मारहाण मद्यपींकडून एकाला मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसरमधील फुरसुंगी परिसरात घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विलास सुदाम गिरी (वय 53, रा. चंदवाडी, फुरसुंगी, हडपसर) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी विशाल राजू शिंदे (वय 35) याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरी हे मध्यरात्री कामावरुन दुचाकीवरुन घरी निघाले होते. चंदवाडीतील जुन्या कालव्याजवळ आरोपीनी त्यांना अडविले. आरोपी नशेत होते. आरोपींनी गिरी यांना शिवीगाळ केली. ‘आम्हाला ओळखत नाही का? ’, अशी विचारणा करुन आरोपींनी त्यांना मारहाण केली. पोलिस हवालदार एस खामगळ तपास करत आहेत.
Source link
पुणे स्टेशन परिसरात एकाचा खून:पार्किंगमधील रिक्षात अनोळखी व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून खून