Headlines

काँग्रेसने माफी न मागितल्यास गंभीर परिणाम होतील:सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून माजी खासदारांचा काँग्रेसला इशारा, शरद पवारांनाही आवाहन




माजी खासदार संजय काकडे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ‘गुंगी गुडिया’ असा शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी काकडे यांनी केली. माफी न मागितल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत काकडे म्हणाले की, राजकारणात एखाद्या महिलेला ‘गुंगी गुडिया’ म्हणणे अत्यंत अपमानजनक आहे. काँग्रेस अशी विचारसरणी बाळगत असेल, तर पक्ष बिकट परिस्थितीत जात आहे. हे वक्तव्य मानवजातीला काळिमा फासणारे असून, महिलांचा सार्वजनिक जीवनात अपमान करण्याचा प्रकार आहे. काँग्रेस नेत्यांना राज्यात फिरू देणार नाही आणि विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. काकडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या टीकेबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. सुनेत्रा पवार सध्या मोठ्या धैर्याने कुटुंबाची आणि राजकीय जबाबदारी सांभाळत आहेत. काँग्रेसला महिलांबद्दल आदर असायला हवा होता, पण तसे दिसून येत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रकरणी राहुल गांधी यांनाही पत्र पाठवून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, असे काकडे यांनी सांगितले. तसेच, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही पत्र पाठवून त्यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राहुल गांधी यांना यावर तीव्र प्रतिक्रिया देण्यास सांगावे, असे सुचवले आहे. आपल्या सुनेवर अशाप्रकारे टीका होणे चुकीचे आहे. शरद पवार यांनी नेहमी महिलांचा सन्मान केला असून, त्यांनी नैतिक भूमिका घेऊन सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन काकडे यांनी केले. महाविकास आघाडीमधील पक्षांनी महाराष्ट्राची संस्कृती आणि सभ्यता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही काकडे यांनी शेवटी नमूद केले. हेही वाचा.. सुनेत्रा पवारांवरील टीकेचे राज्यभर पडसाद: नाशिक-नागपुरात राष्ट्रवादीचे जोरदार आंदोलन, नाशकात काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टीकेचे आता राज्यभर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. मुंबई आणि पुण्यापाठोपाठ नाशिक व नागपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेट आमनेसामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी राष्ट्रवादीकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात ‘चप्पल मारो’ आंदोलन करण्यात आले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *