![]()
वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ (NEET) परीक्षेतील गोंधळामुळे हिंगोली येथील तरुण सुशील ढगे याने आत्महत्या केली होती. या प्रकरणी आपल्या मृत मुलाला न्याय मिळावा, यासाठी सुशीलची आई शीतल ढगे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे सामाजिक कार्यकर्ते अभिजित दीपके य
.
सध्या छत्रपती संभाजीनगर येथे कॉकरोच जनता पार्टी’ची एक महत्त्वाची राष्ट्रीय बैठक सुरू आहे. देशभरातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी या बैठकीसाठी शहरात दाखल झाले आहेत. याच दरम्यान, अनेक नागरिक आपल्या विविध मागण्या घेऊन नेत्यांना भेटत आहेत. शीतल ढगे यांनी याच बैठकीदरम्यान अभिजीत दीपके यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘दिव्य मराठी’शी बोलताना शीतल ढगे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्या म्हणाल्या, “माझा मुलगा सुशील ढगे हा ‘नीट’ परीक्षेतील गोंधळ आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रचंड मानसिक तणावाखाली होता. या तणावाला कंटाळून त्याने आपले जीवन संपवले. माझ्या निष्पाप मुलाच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी मी अभिजीत दीपके यांची भेट घेतली आहे.”
‘नीट’ परीक्षेमुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये वाढलेले औदासिन्य आणि तणाव यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. सुशील ढगे आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.