![]()
आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. राज्यात ३० जुलै २०२६ पासून अॅनालॉग अर्थात नॉन-डेअरी (कृत्रिम) पनीरच्या उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर एका वर्षासाठी पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंढे म्हणाले, राज्यभरातून ३०८ ठिकाणांवरून पनीरचे नमुने घेतले होते. या तपासणीत तब्बल ३५ टक्के नमुने आरोग्यास अत्यंत घातक आढळले आहेत. ३० जुलै रोजी विशेष अधिसूचना काढून अॅनालॉग पनीरवर वर्षभरासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली. हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सना केवळ अस्सल दुधापासून तयार केलेल्या पनीरचाच वापर करावा लागेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुटखाबंदीप्रमाणेच कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल. माफी मागण्याचा प्रश्नच नाही- मुंढे “मी सावजी खाल्ले तर महिनाभर रुग्णालयात पडावे लागेल,” असे विधान मुंढे यांनी नुकतेच केले होते. यावरून हलबा समुदायाच्या उद्योजकांनी मुंढेंनी आपल्या परंपरेचा अवमान केल्याचा आरोप करत माफीची मागणी केली होती. मुंढे म्हणाले, माझे वक्तव्य नीट ऐकल्यास लक्षात येईल की ते पूर्णपणे माझे वैयक्तिक मत होते. मी कोणालाही सावजी खाऊ नका असा सल्ला दिला नाही किंवा इतर कोणी आजारी पडेल असे म्हटले नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव होता. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.
Source link
राज्यात 55 कोटींचे 28 लाखकिलो बनावट पनीर केले जप्त:एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली