![]()
मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा उच्च पातळीवर कायम असून धरण उपयुक्त पाणीसाठ्याच्या ९३.५९ टक्के भरले आहे. सध्या धरणात १०,००८ क्यूसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून, प्रशासनाने गोदावरी नदीपात्रातील विसर्गात काही प्रमाणात कपात केली आहे. सध्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी १,५२०.८३ फूट नोंदवली गेली आहे. धरणात उपयुक्त पाणीसाठा ७१.७५ टीएमसी (२०३१.८५८ दशलक्ष घनमीटर) झाला असून एकूण पाणीसाठा ९७.८१ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. धरणाच्या सुरक्षेचा उपाय म्हणून मुख्य २७ पैकी ८ दरवाजे (क्र. १० ते २७) अर्धा फूट उंचीने उघडे ठेवण्यात आले आहेत. कार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणाच्या मुख्य सांडव्यातून ४,३२८ क्यूसेक, उजव्या कालव्यातून १,१०० क्यूसेक आणि डाव्या कालव्यातून ८०० क्यूसेक असा एकूण ६,२२८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातील पाण्याचा साठा मोठा असल्याने गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, नदीपात्रात विनाकारण प्रवेश करू नये आणि प्रवाहाबाबत सतर्क राहावे, असे आवाहन शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी केले आहे.
Source link
जायकवाडी:९३.५९%; आठ दरवाजांतून विसर्ग