Headlines

कारवाईची भीती उरली नाही का?‎:दोन महिन्यांपूर्वी 255 किलो प्लास्टिक जप्त‎ केलेल्या बेकरीत 25 किलो कॅरीबॅग सापडल्या‎




दोन महिन्यांपूर्वी २५५ किलो प्रतिबंधित‎ प्लास्टिक जप्त करून २५ हजार ‎रुपयांचा दंड ठोठावलेल्या जुना मोढा ‎येथील नवकार बेकरीवर‎ महानगरपालिकेने शुक्रवारी (७‎ऑगस्ट) पुन्हा धडक कारवाई केली.‎या वेळी २५ किलो प्रतिबंधित ‎प्लास्टिकचा साठा जप्त करून पुन्हा‎२५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात‎आला. एकाच व्यापाऱ्याकडून वारंवार‎नियमभंग होत असल्याने दंडाची भीती‎उरली आहे का, असा प्रश्न उपस्थित‎झाला आहे.‎ महानगरपालिकेच्या घनकचरा‎व्यवस्थापन विभागाच्या पथकाने जुना‎मोढा येथील नवकार बेकरीवर छापा‎टाकला. तपासणीत २५ किलो‎प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा आढळून‎आला. तो जागेवरच जप्त करून‎निकामी करण्यात आला. तसेच‎व्यापाऱ्यावर २५ हजार रुपयांचा दंड‎आकारण्यात आला. विशेष म्हणजे,‎एप्रिल महिन्यात याच बेकरीवर‎कारवाई करून २५५ किलो प्रतिबंधित‎प्लास्टिक जप्त करण्यात आले होते.‎त्या वेळीही २५ हजार रुपयांचा दंड‎ठोठावण्यात आला होता. मनपाने‎समज दिल्यानंतरही पुन्हा नियमभंग‎झाल्याने या कारवाईला विशेष महत्त्व‎प्राप्त झाले आहे. मनपा आयुक्त‎अमोल येडगे यांच्या आदेशानुसार‎आणि घनकचरा व्यवस्थापन‎विभागाचे उपायुक्त नंदकिशोर भोंबे‎यांच्या देखरेखीखाली ही कारवाई पार‎पडली. शहरात गस्त घालत असताना‎”नागरिक मित्र पथका”तील देविदास‎सुसर व बालाजी साबळे यांना‎मिळालेल्या माहितीच्या आधारे झोन‎क्र. ०२ मधील जुना मोढा भागात ही‎धडक कारवाई करण्यात आली.‎ कारवाईची भीती उरली नाही का?‎ देशभरात १ जुलै २०२२ पासून ”सिंगल यूझ‎प्लास्टिक”वर बंदी लागू आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित‎प्लास्टिकचा वापर, साठा आणि विक्री दंडनीय आहे.‎तरीही कारवाईनंतरही त्याच दुकानात पुन्हा प्लास्टिक‎सापडत असेल, तर केवळ किरकोळ व्यापाऱ्यांवर‎कारवाई करून प्रश्न सुटणार का? की प्लास्टिकच्या‎उत्पादन आणि घाऊक पुरवठा साखळीवरही‎कारवाईची गरज आहे, हा प्रश्न या घटनेने पुन्हा‎ऐरणीवर आणला आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *