Headlines

6 लाखांची सुपारी घेऊन‎ हिंगोलीच्या तरुणाचा खून‎:विदर्भातील सत्तरमाळ जंगलात आढळला मृतदेह‎




शहरातून बेपत्ता झालेल्या २३ वर्षीय‎‎ तरुणाचा ‎‎विदर्भातील‎‎ खंडाळा पोलिस ‎‎ठाण्यांतर्गत‎ ‎सत्तरमाळ ‎‎जंगलात खून‎ ‎झाल्याचे उघड‎ ‎झाले आहे. ६‎ लाखांची सुपारी देऊन हा खून‎ करण्यात आल्याचे यवतमाळ‎ स्थानिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक ‎चौकशीत स्पष्ट झाले आहे. या‎प्रकरणी ८ जणांना अटक केली आहे.‎ हिंगोली शहरातील सिध्दार्थनगर‎ भागातील मंगेश उर्फ काल्या मनवर‎(२३) हा २ ऑगस्टला कामावर गेला‎ होता. रात्री उशीरापर्यंत तो परत आला‎ नसल्याने कुटुबियांनी त्याचा शोध‎ घेतला. ४ ऑगस्टला कुटुंबियांनी‎ हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता‎ झाल्याचा अर्ज दिला होता. यवतमाळ ‎जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ‎ठाण्याच्या हद्दीतील सत्तरमाळ‎ जंगलात अनोळखी मृतदेह आढळून‎आला. मृतदेहाच्या गळ्यावर,‎ पाठीवर वार करून खून केल्याचे ‎स्पष्ट झाले होते. तपासात हात मृतदेह‎ हिंगोलीतील बेपत्ता तरुण मंगेश मनवर‎याचा असल्याचे स्पष्ट झाले.‎ तपासात संशयित ज्ञानेश्‍वर राठोड,‎राहुल लोखंडे, श्रावण भवाळ,‎सोमनाथ हजारे, विशाल राठोड,‎अर्जुन शेळके, दीपक जाधव,‎सिध्दार्थ जाधव (सर्व रा. वाशीम)‎यांना अटक केली आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *