![]()
शेंद्रा, बिडकीन आणि ढोरेगाव या औद्योगिक क्षेत्राला वेगवान जोडणी देण्यासाठी प्रस्तावित ७३.२६५ किलोमीटर लांबीचा सहापदरी ग्रीनफील्ड रस्ता ‘ओपन ॲक्सेस’ (मुक्त प्रवेश) स्वरूपाचा असेल. त्यावर ताशी १०० किमी वेगाने वाहने धावतील. त्यामुळे ७३ किमीचे अंतर ४५ मिनिटांत गाठता येईल. रस्त्याची उंची साडेतीन फूट असेल. यात ४ उड्डाणपूल (फ्लायओव्हर), २ मोठे पूल, ३१ लहान पूल, ९६ कल्व्हर्ट आणि २ टोल प्लाझा उभारणीचे नियोजन आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक (वर्ल्ड बँक) प्रकल्प विभागाने या महत्त्वाकांक्षी रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे. दोन टप्प्यात राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे ४६८.८० हेक्टर जमीन संपादित केली जाईल. ४८ गावांतील शेतजमिनी बाधित होतील. जमीन संपादनासाठीची अधिसूचना, खर्चाचा अंदाजही तयार झाला आहे. प्रकल्पाच्या रेखांकनाला (अलाइनमेंट) मंजुरी मिळाली आहे.
Source link
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:संभाजीनगरच्या शेंद्रा ग्रीनफील्ड मार्गावर 73 किमीचा प्रवास 45 मिनिटांत होणार, वाहने ताशी 100 किमी वेगाने धावतील