Headlines

हिंगोलीत 25 लाखांसाठी विवाहितेचा छळ:सासरच्या 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल




पुणे येथे प्लॉट घेण्यासाठी माहेरावरून २५ हजार रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या ८ जणांवर हट्टा पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. ७ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील हयातनगर येथील सारिका यांचा विवाह खैरगाव बुद्रूक (ता. अर्धापूर) येथील आकाश सोळंके याच्या सोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्या मंडळींनी त्यांना त्रास देण्यास सुरवात केली होती. त्यानंतर ते वघोली (पुणे) येथे राहण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणीही सासरच्या मंडळीकडून त्रास कायम होती. पुणे येथे प्लॉट घेण्यासाठी माहेरावरून २५ लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून त्यांचा छळ केला जात होता. दरम्यान, माहेरची आर्थिक परिस्थिती बेतातीच असल्याने सारिका ह्या माहेरावरून पैसे आणू शकत नव्हत्या. त्यामुळे सासरच्या मंडळींनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली तसेच उपाशीपोटी ठेऊन मानसिक छळ केला जात होता. सासरचा छळ असह्य झाल्याने त्या माहेरी हयातनगर येथे राहण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतरही सासरची मंडळी पैशासाठी तगादा लावत होती. सासरचा छळ असह्य झाल्याने सारिका यांनी हट्टा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी आकाश सोळंके, प्रभाकर सोळंके, कुंता सोळंके (रा. खैरगाव बुद्रूक ह. मु. वाघोली, पुणे), सुरेखा सारंग, पांडूरंग सारंग (रा. हयातनगर), रंजना रासे (रा. नांदेड), नंदिणी भुजबळ (रा. शिक्रापूर, पुणे), शितळ भुजबळ (रा. तळेगाव दाभाडे, पुणे) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक बोरकर, जमादार चव्हाण पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *