Headlines

‘सिद्धिविनायक’च्या दानात 18 कोटींची चोरी:‘ऑडिट’चे फडणवीसांचे आदेश, राज ठाकरे यांनी 8 दिवसांपूर्वी केलेल्या आरोपांची दखल




श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दानात १८ कोटींची चोरी होत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी १ ऑगस्ट रोजी केला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२१ ते २०२६ कालावधीतील मंदिराच्या आर्थिक व्यवहाराचे विशेष लेखापरीक्षण व सखोल चौकशीचे आदेश दिले. यासाठी नगरविकास विभाग आणि विधी व न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन केली. ही समिती गेल्या ५ वर्षांतील देणग्या, सोन्या-चांदीचे दागिने व सर्व आर्थिक नोंदींची तपासणी करेल. विश्वस्तांचे गुप्त पत्र अन् राज ठाकरे यांचा बाण सिद्धिविनायकच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेले गोपनीय पत्र १ ऑगस्ट रोजी राज ठाकरेंनी सार्वजनिक केले. या पत्रानुसार, दानपेटीतील गैरव्यवहार प्रकरणी ९ कर्मचाऱ्यांवर कारवाईपूर्वी दर बुधवारी सरासरी ५० लाख रुपयांचे संकलन होत होते. कारवाईनंतर ही रक्कम प्रति आठवडा ७५ लाख ते १.५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. म्हणजेच दर आठवड्याला सुमारे ३५ ते ४० लाख रुपये (वार्षिक सुमारे १८ कोटी रुपये) गायब होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. राज यांच्या आरोपांनंतर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर म्हणाले की, मंदिरातील नियमांची व सुरक्षेची कडक अंमलबजावणी केल्यामुळेच मंदिराचे वार्षिक उत्पन्न ११४ कोटी रुपयांवरून थेट १८२ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *