Headlines

नशामुक्त भारत अभियानचा जागर:प्रशासनासह गाडगेबाबा प्रतिष्ठानचा उपक्रम‎




पोलिस दलाच्या मिशन उड्डाण, आदर्श कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, अकोला आणि गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ उत्साहात राबवण्यात आले. विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या पुढाकाराने आयोजित या अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैली, तंबाखूमुक्त परिसर आणि नशामुक्त समाजाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. रक्षा डवरे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. डॉ.धम्मसेन शिरसाठ, समुपदेशक, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून तंबाखूमुक्त परिसर या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. अभियानांतर्गत नशामुक्त भारत अभियानाचे उद्घाटन, व्यसनमुक्ती पथनाट्य, पोस्टर, घोषवाक्य, चित्रकला व निबंध स्पर्धा,जनजागृती रॅली, मानवी साखळी, स्वाक्षरी अभियान, व्यसनमुक्ती शपथ तसेच व्यसनमुक्ती विषयक माहितीपत्रके व हेल्प लाइन माहितीचे वितरण प्रास्ताविक प्रा. रोहन बुंदेले यांनी केले. संचलन प्रा. पडगिलवार यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा. रोशन कोरडे यांनी केले. विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या ‘मेरा युवा भारत’ केंद्र, अकोला यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.कु. पूनम पैठणे हिने रील स्पर्धेत द्वितीय क्रमांक,तर कु. नारायणी शास्त्री हिने वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आदर्श महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. रक्षा डवरे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली ‘नशामुक्त भारत अभियान’ या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *