![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे गटाच्या खासदारांना दिलेल्या भेटीवरून आणि देशातील सद्यस्थितीवरून शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “पंतप्रधान मोदी संसदेत येत नाहीत, मात्र त्यांनी गद्दारांसाठी दिल्लीत कॅटरिंग उघडली आहे, असा घणाघात राऊत यांनी केला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या पंतप्रधानांकडील भेटीच्या वेळेबाबतही त्यांनी मोठा खुलासा केला आहे. “ठाण्याच्या टिकोजीरावांना परस्पर पक्ष दिला” राज्यातील सत्तासंघर्षावर आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोट ठेवत संजय राऊत म्हणाले, “गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेच्या अपात्रतेची सुनावणी प्रलंबित होती, ती आता पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू झाली आहे. राऊत अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेंवर टीका करत म्हणाले, निवडणूक आयोगाने ठाण्याच्या या ‘टिकोजीरावांना’ परस्पर पक्ष देऊन टाकला. केवळ विधिमंडळातले काही आमदार सोडून गेले, म्हणून त्यांना पक्ष दिला गेला. पण आता विधिमंडळातला पक्ष वेगळा आणि मूळ पक्ष वेगळा आहे. आमचा मूळ पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे सोपवला आहे आणि आम्ही सगळे त्याच मूळ पक्षाबरोबर ठामपणे काम करत आहोत.” “सुप्रीम कोर्टावर दबाव, पण आम्हाला न्यायाची खात्री” काल उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी काल स्पष्ट भूमिका मांडली आहे. पक्षफुटीसंदर्भातील खटला सुरू असताना, गद्दार खासदारांना भेटून मोदी अप्रत्यक्षपणे सुप्रीम कोर्टावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आधी आमदार फोडले, आता खासदार फोडले. मी कालच म्हणालो होतो की मोदींनी कॅटरिंग उघडली आहे. त्यांना गद्दारांना भेटायला वेळ आहे, पण संसदेत यायला वेळ नाही. तरीही, या देशाचे संविधान आणि सुप्रीम कोर्ट हे पंतप्रधान मोदींपेक्षा मोठे आहे. आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात निष्पक्ष न्याय देईल.” सुप्रिया सुळे कुठेही जाणार नाहीत! राऊतांचा खुलासा खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना राऊत म्हणाले, “माझे कालच सुप्रिया सुळेंशी बोलणे झाले आहे. त्यांनी मला सांगितले की, नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे खासदारांना भेटतच नाहीत आणि संसदेतही येत नाहीत, त्यामुळे राज्याचे आणि मतदारसंघाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याच प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी सुप्रिया सुळेंनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांच्या वतीने मोदींकडे वेळ मागितला. त्या इतर कुठेही जाणार नाहीत, त्या आमच्यासोबतच आहेत.” असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. मनोज जरांगेंना आभाळातून ज्ञान प्राप्त झालंय:दाढी नसली तरी सरकार त्यांची दाढी कुरवाळेल, विजय वडेट्टीवारांचा घणाघात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकार, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज ठाकरे यांच्या दौऱ्यासह विविध मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली. राज्यात भाजप आणि शिवसेनेत मोठे शीतयुद्ध सुरू असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना ‘आभाळातून ज्ञान’ प्राप्त झाल्याचा टोला लगावला. सविस्तर वाचा
Source link
संविधान आणि सुप्रीम कोर्ट पंतप्रधान मोदींपेक्षा मोठे:आम्हाला नक्की न्याय मिळेल – संजय राऊत