Headlines

मंत्र्यांची आई-बहीण काढणाऱ्या जरांगेंवर सर्वपक्षीय नेते गप्प का?:लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल, ओबीसींची वज्रमूठ बांधण्यासाठी उद्या सोलापूर दौरा




राज्यात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी आपण सोलापूरमध्ये येणार असल्याची घोषणा केली असून, यावेळी त्यांनी जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोलही केला आहे. मनोज जरांगे हे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरत असून, ओबीसी मंत्र्यांच्या व्यंगाचीही खिल्ली उडवत आहेत. या प्रकाराला सडेतोड उत्तर देण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात ओबीसींची भक्कम वज्रमूठ बांधण्यासाठी मी उद्या सोलापुरात येत आहे, अशी माहिती देणारा व्हिडिओ ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून हाके यांनी सर्व ओबीसी बांधवांना सोलापूरमध्ये मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे जाहीर आवाहन केले आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, मनोज जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून ओबीसीचे आरक्षण संपवणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी सोलापूरला येणार आहे. विरोधी पक्ष सत्तेतले पक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसीचे नेते यापैकी कोणीही ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाही. अनेक मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली जात असताना एकही मंत्री बोलत नाही. पक्षाचा पदाधिकारी बोलत नाही. महाराष्ट्रामधल्या ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती मधल्या लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी मनोज जरांगे नावाचा माणूस महाराष्ट्रामध्ये धमाकूळ घालतोय. आईमाईवरुन शिव्या घालतोय, ओबीसीच्या वेगवेगळ्या नेत्या नेत्यांना शिव्या देतोय, त्यांच्या जातीला शिव्या देतोय, त्यांच्या शारीरिक व्यंग्यावर बोलतोय. या सर्व गोष्टींचा परामर्श घेण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता आपण सोलापूरमध्ये मोहोळ मधून मोहोळ मार्गे मी सोलापूरला येतोय, अशी माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *