![]()
तरुणाने बॅटने वार करुन आईची हत्या केली.त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्याकेली. ही घटना नांदेड शहरातील तरोडाभागातील राहुल कॉलनीत शनिवारी रात्रीउशिरा घडली. प्रतीक चौथरे (२४) आणिभारती चौथरे (५२) अशी दोघा मृतांची नावेआहेत. प्रतीकवर मानसोपचार तज्ज्
.
राहुल कॉलनी येथील बालाजी सोपानचौथरे हे सीआरपीएफमध्ये पाँडिचेरी येथेकर्तव्य बजावतात. त्यांची मुलगी प्राची पुणेयेथे शिकते, तर पत्नी भारती आणि मुलगाप्रतीक हे दोघेच नांदेड येथे होते. प्रतीकचीमानसिक स्थिती खालावत असल्यानेआई-वडिलांनी त्याला नांदेडच्या एकामनोविकार तज्ज्ञाकडे दाखवले होते.
९ ऑगस्टला सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घराचे दार बंदहोते. त्यामुळे नातेवाईकांनी प्रतीकच्या मामाला फोनकरून माहिती कळवली. प्रतीकचे मामा तातडीनेघटनास्थळी आले. त्यावेळी इतरांच्या मदतीने त्यांनीघराचा दरवाजा तोडला. आत गेल्यावर त्यांना रक्ताच्याथारोळ्यात पडलेली बहीण दिसली. त्यानंतर भाचाप्रतीकचा शोध घेतल्यावर दुसऱ्या खोलीत त्याने गळफासघेतल्याचे समोर आले. घटनेची माहिती भाग्यनगरपोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोन्ही मृतदेहशासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे पाठवले.
संशयामुळे प्रतीक आईसोबतनेहमी वाद घालत असे. एवढेचनव्हे तर तो घरी आईने बनवलेलेजेवण न करता ऑनलाइनखाद्यपदार्थ मागवत होता.आई-वडील आपली वैयक्तिकमाहिती लिक करत असल्याचाराग त्याच्या मनात वाढत होता.
८ दिवसांत रेल्वे सेवेत रुजू झाला असता
प्रतीकचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले होते. काहीवर्षापासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.इंटेलिजन्स ब्युरोची त्याला आवड होती. स्पर्धा परीक्षेतूनतो रेल्वेची परीक्षा पास झाला होता. आगामी आठदिवसांत तो रेल्वेच्या सेवेत रुजू होणार होता. वडिलांवरहीत्याने एकदा चाकूहल्ल्याचा प्रयत्न केला होता, अशीमाहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.
दरवाजे, खिडक्या बंद करत चढवला हल्ला
मी मनोरुग्ण नाही. तुम्ही मला जाणीवपूर्वक मनोरुग्णठरवत आहात, असे म्हणून प्रतीक आई-वडिलांशी वादघालत होता. याच रागातून शनिवारी रात्री प्रतिकने घराचेदरवाजे, खिडक्या बंद करून आईवर बॅट आणि रॉडनेहल्ला चढवला. या हल्ल्यात भारती चौथरे यांचा मृत्यूझाला. नंतर प्रतीकने घरातील दुसऱ्या खोलीत छताच्याहुकाला आईच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्याकेली. भाग्यनगर पोलिसांत प्रतीकवर गुन्हा दाखल झाला.
घरी न जेवता बाहेरूनमागवायचा खाद्यपदार्थ
याच घरामध्ये प्रतीकने आईवर हल्ला करुन स्वत:देखील गळफास घेत आत्महत्या केली.