Headlines

पुणे मनपा भरती घोटाळा:2 ते 15 लाखांत मनपात नोकरीचे आमिष, 150 जणांना बनावट नियुक्तिपत्र देत पगारही केले, नऊ जणांवर गुन्हा दाखल




पुणे मनपा व इतर मनपांत शिपाई ते अभियंता पदावर नोकरी लावून देतो, असे सांगून संबंधितांकडून 2 ते 15 लाखांपर्यंत पैसे घेण्यात आले. शिपाई ते अभियंता पदासाठी नोकरीची बनावट नियुक्तिपत्रे देण्यात आली. पुणे मनपाचे बनावट लेटरहेड, शिक्के यांचा वापर करून तरुणांची दिशाभूल करण्यात आली. खोट्या स्वाक्षरीद्वारे पुणे मनपाच्या खात्यातून उमेदवारांच्या बँक खात्यात पगारही जमा करण्यात आला. या रॅकेटचा पर्दाफाश शिवाजीनगर पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात आरोपींनी 150 पेक्षा अधिक जणांना बनावट नियुक्तिपत्रे दिल्याचे आढळले आहे. त्यांच्या बँक खात्यात पगार जमा केल्याची एक्सेल शीटही सापडली आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 45 लाखांच्या रोख रकमेची फसवणूक झाल्याची नोंद आहे. 17 जणांची एकूण 2 कोटी 2 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचेही समोर आले आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात 2 जणांची दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. स्वारगेट पोलिस ठाण्यात तीन ते चार जणांची 30 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात बनावट नियुक्तिपत्रे छापली मोठ्या प्रमाणात बनावट नियुक्तिपत्र, ओळखपत्र व पे स्लिपदेखील छापून घेण्यात आल्या. या माध्यमातून एका तरुणाला मनपात नोकरी लावून देतो, असे सांगून त्यांनी तब्बल 45 लाख रुपये घेतल्याचा प्रकार घडला आहे. या तरुणाला नोकरी न मिळाल्याने त्याने पोलिसांकडे व मनपात तक्रार दिली आणि रॅकेट उघडकीस आले. त्यानुसार मनपाच्या प्रशासकीय अधीक्षक शलाका विनायक घोगे (49, रा.बाणेर, पुणे) यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. सुरुवातीला एक ते दोन जणांचे पुणे मनपात काम राजेंद्र खेडकर व शिवानंद पाटील यांनी सुरुवातीला एक ते दोन जणांचे पुणे मनपात भरतीचे काम करून दिले होते, त्या वेळी त्यांना या माध्यमातून झटपट पैसे मिळू शकतात हे समजले. त्यानुसार त्यांनी भालेराव, देशपांडे यांना सोबत घेऊन पुणे मनपाचे बनावट लेटरहेड, बनावट शिक्के एका दुकानात बनवून घेतले. त्यासाठी दुकानदाराला मनपा शाळेत शिपाई पदावर काम करणाऱ्या आरोपींनी मनपाचे नावाने अधिकृत सही-शिक्क्यांचे पत्रदेखील दिले. लीना गायकवाडने पगारासाठी काढली बनावट एजन्सी लीना गायकवाडने रोनित कुंभार याच्या मदतीने आरोपींना बनावट नियुक्तिपत्र दिल्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी लीना फॅलिसिटी सर्व्हिसेस नावाने बँक ऑफ महाराष्ट्राच्या पद्मावती शाखेत स्वत:चे चालू खाते काढले. बनावट सही, शिक्क्यांचा वापर करून उमेदवारांचे एक ते दोन महिन्याचे पगारदेखील अशा प्रकारे काढले गेले. उमेदवारांचा विश्वास संपादित करून त्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा टोळक्याने घातला. ज्या बँक खात्यांचा मुख्य आरोपींनी फसवणूक रक्कम देवाणघेवाण करण्यासाठी वापर केला त्या बँक खातेधारकांना दर महिना 20 ते 40 हजार रुपये दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *