Headlines

चालक दारूच्या नशेत; प्रवाशांचा जीव टांगणीला‎:वाशिम-नालासोपारा एसटीचा 40 किलोमीटर थरार; अखेर बसच्या वाहकाने हाती घेतले स्टिअरिंग




वैजापूर चालक दारुच्या नशेत आणि बसमध्ये २५ प्रवासी. छत्रपती संभाजीनगर ते गारजपर्यंत ४० किलोमीटरचा जीवघेणा प्रवास वाशिमहून नालासोपाऱ्याकडे जाणाऱ्या एसटीतील प्रवाशांनी बुधवारी अनुभवला. बस सात ते आठ वेळा अपघातग्रस्त होता-होता वाचल्याचा दावा प्रवाशांनी केला. अखेर गारज परिसरानंतर वाहकाने स्टेअरिंग हाती घेत बस वैजापूरपर्यंत आणली. वाशिम-नालासोपारा एसटी (एमएच १४ एमएच ९८३६) दुपारी दोनऐवजी चार वाजता वैजापूर बसस्थानकात पोहोचली. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, संभाजीनगरनंतर चालकाच्या वाहन चालविण्याच्या पद्धतीमुळे वारंवार अपघाताची भीती निर्माण झाली. वैजापुरात बस पोहोचताच प्रवाशांनी चालक व वाहकाला जाब विचारला. अनेकांनी त्याच बसने पुढे जाण्यास नकार दिला. प्रभारी आगारप्रमुख गोपाळ पगारे यांनी दुसऱ्या बसची व्यवस्था करून प्रवाशांना रवाना केले. त्यानंतर संबंधित चालकाला मद्यप्राशनाच्या वैद्यकीय तपासणीसाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आणि पुढे पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर सत्य समोर येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. वैद्यकीय अहवालानंतर सत्य समोर येणार प्रवाशांनी चालक मद्यधुंद असल्याचा आरोप केला असला तरी वैद्यकीय तपासणीचा निष्कर्ष अद्याप स्पष्ट झालेला नाही. मद्यप्राशन केले होते की नाही, हे वैद्यकीय अहवालानंतरच निश्चित होणार आहे. चालक नालासोपारा आगारात कर्तव्यावर आहे. – गोपाळ पगारे, प्रभारी आगारप्रमुख, वैजापूर वैजापूर स्थानकावर बस चालक, वाहकाची प्रवाशांनी चौकशी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *