Headlines

बीडमध्ये एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही:मनोज जरांगे पाटलांचा दावा तथ्यहीन, महसूल विभागाचा खुलासा




बीड जिल्ह्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून रद्द करण्यात आलेले नाही. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विविध वृत्तवाहिन्यांवर केलेले दावे पूर्णपणे तथ्यहीन आणि वस्तुस्थितीला धरून नाहीत, असा स्पष्ट आणि अधिकृत खुलासा बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाला सादर केलेल्या चौकशी अहवालात केला आहे. ‘नमुना-33’ नियमित प्रक्रियेनंतर अपलोड अहवालानुसार, माजलगाव नगर परिषदेच्या नगरसेविका रेखा अंबुरे यांनी खळवट लिमगाव येथील कुणबी नोंदीसंदर्भातील ‘नमुना-33’ संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी अर्ज केला होता. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी आवश्यक चौकशी, प्रतिज्ञापत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 24 जून 2026 रोजी हा नमुना अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला. या प्रकरणात कोणतेही कागदपत्र प्रलंबित नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. केवळ चौकशीचे निर्देश दरम्यान, माजलगाव नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुमन माणिकराव मुंडे यांनी 1 मे 2026 रोजी महसूल मंत्र्यांकडे या प्रकरणी एक अर्ज सादर केला होता. महसूल मंत्र्यांनी या अर्जावर केवळ चौकशी करावी, अशा स्वरूपाचा शेरा देऊन तो अर्ज बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. परंतु, मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना, “महसूल मंत्र्यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत सूचना दिल्या आहेत”, असा आरोप केला होता. अहवालातील महत्त्वाचे मुद्दे प्रमाणपत्र रद्द नाही : बीड जिल्ह्यातील कोणतेही कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले नाही. केवळ चौकशीचे निर्देश : महसूल मंत्र्यांनी केवळ आलेल्या तक्रार अर्जावर चौकशीचे निर्देश दिले होते; प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले नव्हते. नमुना-३३ अपलोड : रेखा अंबुरे यांच्या अर्जानुसार भूमी अभिलेख चौकशीअंती २४ जून २०२६ रोजी ‘नमुना-३३’ संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. वादावर पडदा? बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी स्वाक्षरी केलेला हा अहवाल महसूल मंत्री कार्यालयात सादर करण्यात आला आहे. या अधिकृत स्पष्टीकरणानंतर बीड जिल्ह्यातील कुणबी प्रमाणपत्रांबाबत सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हेही वाचा.. कुणबी दाखले रद्द करण्याचे आदेश मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन:मराठ्यांचे वाटोळे केले तर सुट्टी देणार नाही- मनोज जरांगे पाटील कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी देण्यात आलेले आदेश तात्काळ मागे घ्यावेत आणि झालेली चूक दुरुस्त करावी. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्याची चूक मान्य करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सांगली दौऱ्यावर असताना ते बोलत होते. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून ठिकठिकाणी मराठा बांधवांशी संवाद साधून 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘निर्णायक’ आंदोलनाची रणनीती आखत आहेत. या दौऱ्यादरम्यान सांगलीत मीडियाशी बोलताना त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *