![]()
नागपंचमी उत्सवानिमित्त जामखेड शहरात होणाऱ्या आनंद मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत विविध प्रश्नांवरून जोरदार चर्चा झाली. मेळाव्याचे ठिकाण, पार्किंग व्यवस्था, तिकीट दर, सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेरे, मोकाट जनावरे आणि शहरातील रस्त
.
बैठकीस नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदू गोरे, नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप टापरे यांनी मोकाट जनावरे, रस्त्यांवरील खड्डे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. राहुल उगले यांनी मेळाव्याच्या ठिकाणी पार्किंगच्या प्रश्नावरून वाद निर्माण होऊ नयेत, यासाठी योग्य नियोजनाची मागणी केली. अजयदादा काशीद यांनी कुस्ती स्पर्धेमुळे मोठी गर्दी होत असल्याने स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी केली. नगरसेवक प्रशांत राळेभात यांनी शांतता समितीच्या बैठकीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असून कोणाचाही आवाज दाबला जाऊ नये, अशी भूमिका मांडली. डिगा चव्हाण यांनी शहरातील तीन ठिकाणी मेळावा भरविण्याचा पर्याय सुचविला. तिकीट दर कमी करण्याची मागणीही करण्यात आली. नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी मागील वर्षीचे १०० रुपयांचे तिकीट दर यंदा कायम ठेवले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. नागरिकांना आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
रात्री १० वाजेपर्यंत मेळावा पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी आनंद मेळाव्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. मेळाव्याचे वेळापत्रक रात्री दहा वाजेपर्यंत राहणार आहे. मेळावा नेमका कुठे भरवायचा, याचा निर्णय तहसीलदार व नगरपरिषद प्रशासन घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शांतता समितीच्या बैठकीतच मेळाव्याच्या नियोजनावरून विविध मतप्रवाह समोर आले. मुख्याधिकारी बैठकीस गैरहजर राहिल्याने नगरपरिषद प्रशासनाची भूमिका काय राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.