![]()
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज पंढरपूर दौऱ्यादरम्यान चंद्रभागा नदी घाट तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी प्रथम चंद्रभागा घाट परिसराची पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी नदीपात्र स्वच्छता, भाविकांसाठी स्नान सुविधा, प्रकाश व्यवस्था, घाटावरील सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. त्यानंतर अग्रवाल यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली. या वेळी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत ७३ कोटीच्या निधीतून झालेल्या मंदिर विकास, सुशोभीकरण कामांची पाहणी ही त्यांनी केली. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी प्रस्तावित श्री क्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाबाबत माहिती दिली. यामध्ये मंदिर परिसरातील भाविकांसाठी सुलभ दर्शन मार्ग, प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग व अत्याधुनिक सुविधा तसेच भक्त निवास, बहुमजली पार्किंग, प्रसादालय, माहिती केंद्र, वैद्यकीय मदत कक्ष, वृद्ध व दिव्यांगांसाठी विशेष मार्ग, गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रवेश-निर्गम मार्ग, सीसीटीव्ही व अग्निशमन यंत्रणा यांची माहिती दिली. या वेळी नगराध्यक्षा प्रणिता भालके, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, प्रांत अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुंटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, व्यवस्थापक उपस्थित होते.
Source link
मुख्य सचिवांकडून चंद्रभागा घाट, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची पाहणी:भाविकांची स्नान व्यवस्था, स्वच्छतेची घेतली माहिती