Headlines

धावत्या पीएमपी बसमध्ये महिला वाहकावर जीवघेणा हल्ला:तिकीट काढण्यावरून वाद, प्रवाशाने चालवला चाकू, प्रवासी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल




पुणे स्टेशन परिसरात धावत्या पीएमपी बसमध्ये एका प्रवासी तरुणाने वाहक महिलेवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी प्रवासी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुरेखा बळीराम भालेराव (वय 38, रा. मुळशी, मूळ रा. मुखेड, नांदेड) असे जखमी झालेल्या वाहक महिलेचे नाव आहे. त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका भवन ते विमाननगर मार्गावरील पीएमपी बस पुणे स्टेशन परिसरातील अलंकार चित्रपटगृह चौकातून जात असताना ही घटना घडली. भालेराव प्रवाशांचे तिकीट काढत असताना त्यांनी एका प्रवासी तरुणाला तिकीट काढण्यास सांगितले. यावरून तरुणाने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भालेराव यांनी त्याला बसमधून खाली उतरण्यास सांगितल्यावर, संतप्त तरुणाने त्यांच्या मांडीवर चाकूने वार केला. त्यानंतर तो प्रवासी तरुण बसमधून उडी मारून पसार झाला. पसार झालेल्या तरुणाचा शोध सुरू असून, पोलिस उपनिरीक्षक एन. चव्हाण पुढील तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार दरम्यान, आणखी एका घटनेत, अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आणि ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी एका आरोपीवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल उर्फ सागर वसंत रानडे (वय 24, रा. शेडगे डेअरी, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार जानेवारी 2025 ते 15 मार्च 2026 या कालावधीत घडला. आरोपीने मुलीचा गर्भपात घडवून आणल्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *