![]()
सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग व कायगाव येथील नागरिकांची कायगाव ते छत्रपती संभाजीनगर बस सुरु करण्यात यावी, यासाठी मागणी होत होती. अखेर शिक्षण सभापती अनिताताई मोटे व सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोटे यांच्या पाठपुराव्यामुळे टाकळी जिवरग व कायगाव येथे नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या नव्या सेवेमुळे सिल्लोड, फुलंब्री, भोकरदन या तीन तालुक्यांतील टाकळी जिवरग, कायगाव, तलवाडा, गव्हाली, गोषेगाव, वजीरखेडा, निमखेडा ,गेवराई, पाडळी या गावातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. बस बंद असल्यामुळे शाळकरी मुले, महाविद्यालयीन तरुण, नोकरदार वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. दैनंदिन कामांसाठी शहरात ये-जा करताना नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागायचा, ज्यामुळे प्रवासाचा खर्चही वाढला होता. शिक्षण सभापतींचे विशेष प्रयत्न : नागरिकांची हीच बिकट परिस्थिती लक्षात घेऊन, शिक्षण सभापती अनिताताई मोटे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी तातडीने संबंधित आगार व्यवस्थापक आणि परिवहन अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन या भागातील बस सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला व सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले.
Source link
कायगाव ते छत्रपती संभाजीनगर बससेवा:शिक्षण सभापती अनिताताई मोटे यांचा पाठपुरावा