![]()
प्रेमीयुगुलाच्या शोधासाठी सुरू असलेल्या तपासात ‘तुझा मित्र मुलीला घेऊन पळून गेला, तो कुठे आहे सांग’ असा जाब विचारत चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावलेल्या २६ वर्षीय तरुणाला बेल्ट आणि लाठीने बेदम मारहाण केल्याच्या आरोपाने वीरगाव पोलिस ठाणे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. माळीसागज येथील नारायण वैजनाथ गिधाने यांच्या पाठीवर उमटलेले वळ समोर आल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले. पोलिस उपनिरीक्षक अशोक माने व अन्य कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप गिधाने व त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मारहाणीनंतर नारायण यांनी उपजिल्हा रुग्णालय गाठून वैद्यकीय तपासणी करून घेतली. नारायण यांच्यावर कोणताही गुन्हा नोंद नसताना त्यांना चौकशीसाठी बोलावून मारहाण का करण्यात आली, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. रविवारी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी वीरगाव पोलिस ठाण्यात धडक देत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर सोमवारी ग्रामस्थांनी थेट ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत तक्रार करण्यासाठी पुढाकार घेतल्याने प्रकरण वरिष्ठ स्तरावर पोहोचले आहे. कलम ३६३ अंतर्गत दाखल प्रकरणाच्या आले होते. मारहाण झाल्याची तक्रार घेऊन त्याच्या घरातील व्यक्ती पोलिस ठाण्यात आले आहेत. या प्रकरणाची माहिती घेत असून नेमके काय झाले, याची चौकशी सुरू आहे. – प्रदीप भिवसने, ठाणेदार, वीरगाव
Source link
तरुणाला बेल्ट-लाठीने बेदम मारहाणीचा आरोप:संतप्त ग्रामस्थांची पोलिस अधीक्षकांकडे धाव