Headlines

मलिक साहेबांचा संदल उरूस उत्साहात; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे घडविले दर्शन:पांडेत भक्तांनी फुलांची चादर केली अर्पण ; हिंदू बांधवांनीही घेतले दर्शन‎



हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असलेला पांडे (ता. करमाळा) येथील मलिक साहेब पिरांचा संदल उरूस यंदाही मोठ्या उत्साहात अन् भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. उरूसानिमित्त दिवसभर हिंदू-मुस्लिम बांधवांनी मलिक साहेबांच्या दर्ग्यावर फुलांची चादर अर्पण करू

.

प्रकाश जगताप व सुनीलाल मुजावर यांच्या हस्ते संदल घोड्याला फुलांची चादर अर्पण करण्यात आली. त्यानंतर संदल मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत साई बॅन्जो, हलगी पथक सहभागी झाले होते. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरामुळे गावातील वातावरण उत्साहाने भरून गेले होते. झेंडे आणि घोडा हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. उरूस कमिटीच्या वतीने माजी सरपंच तुकाराम शिरसागर, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती भोसले, बाबू कोल्हे व महादेव भोसले यांचा अकबर मुजावर व पत्रकार दस्तगीर मुजावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उरूसानिमित्त गावातील बरडे, कांबळे, भोसले तसेच पिराच्या मंदिरातही फुलांची चादर अर्पण करण्यात आली.अकबर मुलाणी व ईसाक मुलाणी यांनी कुराण पठण केले. देशात सुख-शांती नांदावी तसेच यंदा चांगला पाऊस मिरवणूक गावातून जात असताना संत सावता माळी सप्ताहानिमित्त प्रवचन सुरू होते. त्यावेळी मुस्लिम बांधवांनी प्रवचनाचा आदर ठेवत संदल मिरवणुकीतील वाद्ये बंद केली. त्याचप्रमाणे मिरवणूक पुढे गेल्यानंतर बापू दुधे महाराज यांनीही प्रवचन थांबवून हिंदू बांधव व महिलांना संदल घोड्याचे दर्शन घेण्याची संधी दिली. या प्रसंगातून पांडे गावातील हिंदू-मुस्लिम बांधवांमधील सलोखा, परस्पर आदर आणि एकात्मतेचे दर्शन घडले. धार्मिक कार्यक्रम वेगवेगळे असले तरी एकमेकांच्या श्रद्धेचा आदर करण्याची गावाची परंपरा यावेळी पुन्हा पाहायला मिळाली. मलिक साहेब पिरांची अनेक वर्षांची परंपरा असून मनोभावे पूजा केल्यास नवसाला पावणारे पिर अशी भाविकांची श्रद्धा आहे. मनातील इच्छा पूर्ण होतात, असा अनेक भाविकांचा अनुभव असल्याचे शब्बीर मुजावर यांनी सांगितले. यात्रेनिमित्त दरवर्षी परिसरातील तसेच दूरवरून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. पिरांच्या दर्शनाने मनःशांती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची भावना आहे. यात्रेदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *