![]()
अकोट तालुक्यात दमदार पावसाच्या आगमनानंतर पोपटखेड धरणाच्या जलाशयात वाढ झाली आहे. अशावेळी धरणाचे वक्रद्वार उघडण्याची शक्यता असताना पोपटखेड ते अंबाडी मार्गावरील श्री संत गजानन महाराज विहिर संस्थान जवळील पुलाजवळ बांधलेला वळण मार्ग पाण्याखाली जाण्याची भीत
.
या संदर्भात ७ ऑगस्टला अकोट येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र देत रस्ता बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मार्गाऐवजी मोहाळा अकोलखेड अकोली जहागीर अंबाडी मार्गे गजानन महाराज सजल विहिर संस्थान या पर्यायी मार्गाचा अवलंब भाविकांनी करण्याच सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आल्या आहेत. अकोट तालुक्यातील पोपटखेड ते अंबाडी रस्त्यावर संत गजानन महाराज विहिर संस्थानकडे जाणाऱ्या मार्गावरील पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर असून, या पुलासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण करून तो ३१ डिसेंबरपर्यंत भाविकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पुलाचे काम सुरू असल्याने तयार करण्यात आलेल्या वळण मार्गावरून सध्या वाहतूक सुरू होती. मात्र, पोपटखेड धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हा वळण मार्ग बंद करण्यात आला होता. दरम्यान, ७ ऑगस्ट रोजी पोपटखेड धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने. वळण मार्ग पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद झाली होती.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती कार्यकारी अभियंता, जागतिक बँक प्रकल्प विभाग अकोट, तहसीलदार अकोट आणि पोलिस निरीक्षक अकोट ग्रामीण यांना देण्यात आली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना नागरिकांनी बंद केलेल्या वळण मार्गावरून जाण्याचा धोका पत्करू नये आणि सुरक्षित पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.
पूल डिसेंबरअखेर पूर्ण पाच कोटी खर्च असलेल्या पोपटखेड ते अंबाडी रस्त्यावर संत गजानन महाराज विहिर संस्थानकडे जाणाऱ्या पुलाचे बांधकाम सध्या प्रगतिपथावर आहे. ३१ डिसेंबरअखेर या पुलाचे काम पूर्ण होणार आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना वळण मार्गावर पाणी येण्याची भीती आहे. नागरिकांनी मोहाळा, अकोलखेड, अकोली जहॉगीर, अंबाडी मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
असा राहणार पर्यायी मार्ग संस्थानकडे जाणाऱ्या भाविकांसाठी अकोट- मोहाळा – आंबोडा – अकोलखेड – अकोली जहागीर – अंबाडी मार्गे सजल केलेली विहिर, असा हा पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे. भाविकांनी याच मार्गाचा वापर करावा, अशी विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. तसेच संत गजानन महाराज विहिर संस्थानच्या अध्यक्ष व सचिवांनी आपल्या स्तरावरून भाविकांना पर्यायी मार्गाची माहिती द्यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.