Headlines

कर्मातच ईश्वरसेवा मानत संत सावता महाराजांनी दिला माणुसकीचा संदेश:फिनिक्स फाऊंडेशनच्या शिबिरात उपमहापौर ॲड. जाधव यांचे प्रतिपादन‎



संत सावता महाराजांनी कर्मालाच ईश्वरसेवेचे माध्यम मानून समाजाला माणुसकी, श्रमप्रतिष्ठा आणि भक्तीचा संदेश दिला. याच विचारांचा वारसा पुढे नेत फिनिक्स सोशल फाऊंडेशन हे धर्म, जात-पंथाचा भेद न करता गोरगरीब व गरजू नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहेत.

.

संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनतर्फे नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ॲड. जाधव बोलत होते. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी नेताजी भाबड, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, ग्रामपंचायत सदस्य मयुर पाखरे, यशवंत पानमळकर, संजय ताजणे, राजेंद्र बोरुडे, मोहनीराज कुऱ्हे, भानुदास खरपुडे, सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते.

उपमहापौर जाधव म्हणाले, संत सावता महाराजांनी भक्तीबरोबरच कर्म आणि कर्तव्याला सर्वोच्च स्थान दिले. शेतीचे काम करत असतानाच त्यांनी विठ्ठलाची भक्ती केली. ‘काम हेच देवाची सेवा’ आणि ‘माणसाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा’ हा संदेश त्यांच्या जीवनातून मिळतो. आजच्या काळातही हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे.

फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांचे दृष्टीदोष दूर करून त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी फाऊंडेशन सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी तसेच विविध सणांच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबविण्यासह दर महिन्याला मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरे घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी एकूण ३२५ रुग्णांची नेत्रतपासणी केली. त्यापैकी ७२ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. पुणे येथील के. के. आय. बुधराणी हॉस्पिटलमध्ये या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांची रक्तदाब, मधुमेहासह आवश्यक आरोग्य तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना अल्पदरात चष्म्याचे वाटपही करण्यात आले.सूत्रसंचालन राजेंद्र बोरुडे यांनी, तर आभार गौरव बोरुडे यांनी मानले.

सेवेतून ‘दृष्टी’ देण्याचा फिनिक्सफाउंडेशनचा संकल्प .३२५ : रुग्णांची नेत्रतपासणी .७२ : मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड .मोफत : बुधराणी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया .नेत्रदान- अवयवदान जनजागृतीचा संदेश



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *