Headlines

संत जनाईच्या दानपेटीतील 2500 रुपयांतून श्रीकृष्ण मंदिराची बांधली भिंत‎:गोपाळपूरमधील श्रीकृष्ण मंदिराची पाठीमागील भिंत 1991 मध्ये देवस्थानाच्या गुरव समाजाकडून बांधल्याचा उल्लेख




गोपाळ कृष्ण मंदिरातील जनाबाई मंदिरात जो पैसा दान केला जातो अर्थात येथील सर्व गुरव हे माणसांकडून (भक्तांकडून) जो पैसा घेतला जातो. त्यातून देवस्थानचा खर्च भागवून जे पैसे उरले त्यातून हे मागील (पिछाडीचे) बांधकाम केले आहे. हे येथील समस्त गुरव यांनी हे केले आहे. या कामासाठी २५०० रुपये खर्च आला. हे काम शके १८३३ ज्येष्ठ शुद्ध ९ या तिथीस म्हणजेच ५ जून सोमवार इस १९११ रोजी पूर्ण झाले. या शिलालेखातील २५०० रुपयांच्या खर्चाची नोंद त्या काळातील आर्थिक परिस्थिती, बांधकाम खर्च आणि देवस्थानांच्या आर्थिक क्षमतेचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच श्री जनाबाई यांच्या उल्लेखामुळे त्या व्यक्तीचे मंदिराशी असलेले संबंध, दान परंपरा आणि स्थानिक धार्मिक इतिहासाचा पुढील अभ्यास करण्यास नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. पुराभिलेखशास्त्र, स्थानिक इतिहास आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने हा शिलालेख अत्यंत महत्त्वाचा असून, संशोधनासाठी तो विश्वासार्ह ऐतिहासिक स्रोत मानला जात आहे. प्रतिनिधी | मंगळवेढा शिलालेखाच्या सुरुवातीला श्री गोपाळकृष्ण प्रसन्न असा मंगलाचरणाचा उल्लेख असून, त्यानंतर मंदिराच्या पाठीमागील तटबंदीच्या बांधकामाची माहिती दिली आहे. श्री जनाबाई यांच्या नावाने मिळणाऱ्या निधीतून तसेच देवस्थानाच्या उत्पन्नातून प्रथम नियमित देवस्थान खर्च भागवण्यात आला. त्यानंतर उर्वरित निधीतून तटबंदीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले, अशी स्पष्ट नोंद या लेखात आहे. विशेष म्हणजे हे कार्य समस्त गुरव समाजाने पूर्ण केले असून त्यासाठी २५०० रुपये खर्च झाल्याची नोंदही कोरण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील श्री गोपाळकृष्ण मंदिराच्या मागील तटबंदीवर कोरलेला शके १८३३ (इ.स. १९११) मधील एक महत्त्वपूर्ण शिलालेख प्रकाशात आला असून, तो तत्कालीन देवस्थानांच्या आर्थिक नियोजन, मंदिर व्यवस्थापन आणि सामाजिक सहभागाचा दुर्मिळ ऐतिहासिक पुरावा ठरत आहे. देवनागरी लिपीतील मराठी भाषेतील हा आठ ओळींचा शिलालेख मंदिराच्या मागील तटबंदीच्या बाहेरील भिंतीवर कोरलेला आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते, हा शिलालेख केवळ मंदिराच्या बांधकामाची नोंद नसून तत्कालीन देवस्थानांची आर्थिक शिस्त, निधी नियोजन आणि धार्मिक संस्थांच्या संघटित व्यवस्थापनाची साक्ष देणारा दस्तऐवज आहे. मंदिर व्यवस्थापनात गुरव समाजाची सामूहिक भूमिका होती, हे या लेखावरून स्पष्ट होते. शिलालेख रवी मोरे यांनी शोधला असून, त्याचे वाचन अनिल दुधाणे व कृष्णा गुडदे यांनी केले आहे. १. श्री गोपाल कृष्ण प्रस्न : २. श्री गोपाल कृष्णाची ही पीच्या – ३. डीची बांधनुक श्री जनाबाई ४. मनुशास : जो पैसा घेतात : त्या ५. पैशाचे देवस्थान खर्च भागुन : जे ६. पैसे वुरले : ते हे : काम केले : सम – ७. स्त गुरव यांनि केले खर्च २५०० ८. जेष्ट श्रु ९ सके १८३३



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *