Headlines

4-Year-Old Girl Injured; CCTV Footage Surfaces


पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात सात भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षांच्या मुलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. या घटनेत मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या डोक्यावर 80 हून अधिक टाके पडले आहेत. र

.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील चिखली भागात राहणाऱ्या गिरधर मिश्रा यांची चार वर्षांची मुलगी घराजवळ असलेल्या एका झाडाची पाने तोडण्यासाठी बाहेर गेली होती. ती झाडाजवळ पोहोचली असता तिथे असलेल्या सात कुत्र्यांच्या टोळक्याने तिला घेरले. तिश्रा यांनी सांगितले की, कुत्र्यांच्या कळपाने सुमारे 43 सेकंद मुलीला चावा घेतला. तिच्या हातांना आणि मांडीला जखमा झाल्या आहेत. मुलीचा किंचाळण्याचा आवाज ऐकून स्थानिक लोक तिला वाचवण्यासाठी धावले आणि कुत्र्यांना तिथून पळवून लावले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मंगळवारी समोर आले आहे.

संपूर्ण घटना 6 फोटोंमध्ये पहा…

1. मुलगी घरातून पाने घेण्यासाठी बाहेर पडली

2. कुत्र्यांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला

3. सुरुवातीला 2 कुत्र्यांनी हल्ला केला

4. सात कुत्र्यांच्या मुलीवर हल्ला

5. मुलीचा किंचाळ ऐकून स्थानिक लोक पोहोचले, कुत्रे पळाले

6. लोकांनी कुत्र्यांना पळवून लावले आणि मुलीला उचलून रुग्णालयात नेले

सीसीटीव्हीमध्ये मुलीला घेरताना दिसले कुत्रे

समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 7 कुत्र्यांनी मुलीला चारी बाजूंनी घेरल्याचे दिसत आहे. मुलगी घाबरून पळण्याचा प्रयत्न करत असताना दोन कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करून तिला खाली पाडले. त्यानंतर इतर कुत्र्यांनीही तिच्यावर धाव घेतली. सुमारे 43 सेकंद कुत्र्यांनी तिला चावे घेतले. मुलीचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले. या हल्ल्यात मुलीच्या हातावर, पायावर जखमा झाल्या आहेत.

प्रशासनाकडे कारवाईची मागणी

परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यांचा त्रास वाढला आहे. प्रशासनाने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मुलीच्या वडिलांनी आणि स्थानिक रहिवाशांनी केली आहे. हे ही वृत्त वाचा

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ:अवघ्या 7 तासांत तब्बल 130 जणांना घेतला चावा; रेल्वेस्टेशन परिसरातही प्रवाशांवर हल्ले, अनेक जखमी

कल्याणमधील खडकपाडा परिसरात एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने रविवारी नागरिकांवर हल्ला करत तब्बल 130 हून अधिक जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. रस्त्याने जाणारे नागरिक, परिसरातील रहिवासी आणि वाहनचालक यांनाही या कुत्र्याने लक्ष्य केले. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस, महापालिका आणि श्वान पकडणाऱ्या पथकाने रात्रभर शोधमोहीम राबवून संबंधित कुत्र्याला अखेर पकडले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.